Jalna District

“आम्ही सिद्ध लेखिका” नवोदित महिलांसाठी व्यासपीठ

जालना : अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे शाखा जालनातर्फे कवी,साहित्यिकांचा विशेष सत्कार रविवारी ( ता.दोन ) करण्यात आला.

शहरातील भाग्यनगर परिसरातील संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक प्रा.बसवराज कोरे हे होते. या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून मानसिक आरोग्य समुपदेशक डाॅ.सुजाता देवरे, उपाध्यक्ष आर.आर.जोशी,कार्याध्यक्ष संतोष लिंगायत यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात ‘ आम्ही सिध्द लेखिका साहित्य संस्था जालना शाखेच्या पदाधिकारी यांचा सन्मान चिन्ह, शाल,पुष्पगुच्छ देवून विशेष सत्कार करण्यात आला.नवोदित लेखन करणार्‍या महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘ ‘आम्ही सिध्द लेखिका ‘ साहित्य चळवळ सुुरू करण्यात आली आहे.

यात जिल्हाध्यक्षा संपदा कुलकर्णी, उपाध्यक्षा सुचिता कुलकर्णी, सचिव स्वाती रत्नपारखी, कोषाध्यक्षा सारिका सहस्त्रबुद्धे,कार्याध्यक्षा आरती सदाव्रते, सहसचिव शुभांगी लिंगायत,निमंत्रक प्रणिता लवटे,सुहद नाईक यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. कार्यक्रमात दुर्गा संगीत साधना विद्यालयातील साधक सुयोग सदाव्रते,आर्या गोंदीकर, प्राजक्ता माजलगावकर, अंतरा कुलकर्णी, अभिषेक गोंदीकर यांच्या समूहाने स्वागतगीत गायले.
कार्यक्रमास प्राचार्य डाॅ.गणेश अग्निहोत्री,रामदास कुलकर्णी, संदीप इंगोले, उमाकांत बोमनाळे,रवींद्र देशपांडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

Related Articles