Jalna District

पोलिसांच्या “रेझिंग डे” निमित्त आयुधं पाहण्याची बालकांसह पालकांनाही सुवर्णसंधी

जालना- पोलिसांचा स्थापना दिवस म्हणून दिनांक 2 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान पोलिस प्रशासनाच्या वतीने” रेझिंग डे” सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

या सप्ताहानिमित्त पोलीस कवायत मैदानावर पोलीस तपासात वापरण्यात येणाऱ्या विविध आयुधांची माहिती दिली जात आहे. अन्य वेळी पोलिसांची ही आयुधं पहाण्यासाठी दुर्मिळ तर असतातच मात्र त्यांना पाहून सामान्य माणसाला धडकी भरते. सध्या मात्र पोलिसच स्वतःहूनच त्यांच्याकडे असलेल्या विविध आयुधांची माहिती देतआहेत. जेणेकरून सामान्य माणसाच्या मनामध्ये असलेल्या कुतूहलाला उत्तर मिळते. शाळकरी विद्यार्थी शिक्षिक आणि पालकांसाठी म्हणजेच सर्वसामान्यांना देखील इथे मुक्त प्रवेश आहे. पोलीस तपासामध्ये बॉम्बशोधक पथकाचा कसा वापर केला जातो? एखाद्या दंग्याच्या वेळी दंगा नियंत्रणात आणण्यासाठी पिस्तूल कसे वापरले जाते? त्या पिस्तूल मध्ये गोळी कशी असते, तिचा वापर कसा होतो? एवढेच नव्हे तर बॉम्बशोधक पथक ज्या वेळी बस स्थानक, रेल्वे स्थानक, किंवा अन्य ठिकाणी हातामध्ये यंत्र घेऊन जातात त्या यंत्राला काय म्हणतात? आणि ते कशा पद्धतीने काम करते? याची देखील माहिती इथे सविस्तरपणे विद्यार्थ्यांना सांगितले जात आहे .त्याच सोबत विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे ही दिले जात आहेत ,त्यामुळे पालकांना तर हे उपयोगी आहेत त्याच सोबत शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त माहिती आणि स्वसंरक्षणाचे धडे गिरवण्यासाठी देखील या प्रदर्शनाचा उपयोग होत आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी आवर्जून या प्रदर्शनाला भेट द्यावी असं हे प्रदर्शन आहे.

या प्रदर्शनात *वेपन टेबल* पी. डी. राठोड, एस. जे. जाधव आणि ए. एच. शेख हे माहिती देत आहेत. *शहर वाहतूक* शाखेची माहिती देण्यासाठी महिला पोलीस कर्मचारी डी. एन .निंभोरे, आणि पी.जी. पोटे हे उपलब्ध आहेत .*भरोसा सेल* मध्ये विद्यार्थिनींना गैर मार्गापासून परावृत्त करण्यासाठी या सेलच्या पोलीस उपनिरीक्षकश्रीमती एस. बी. राठोड आणि महिला पोलीस कर्मचारी एस. पठाण या माहिती देत आहेत.*दामिनी पथक* पोलीस उपनिरीक्षक रंजना पाटील आणि आरती साबळे या दोघी मिळून उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत आहेत. *श्वान पथक* पोलीस उपनिरीक्षक बि. एस. कवाळे, पोलीस कर्मचारी एस. पी. गीमनेवार, आर. बी. माळगे, एस. जी. गायकवाड,जी.यु. हिरेकर, एम. आय. शेख.*बॉम्बशोधक व नाशक पथक* पोलीस उपनिरीक्षक आर. सी. पाटील, विजय खरात, एम.जी. उगले, डी. ए .शिंदे, मनीष परिहार ,हे उपलब्ध आहेत.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button