Jalna Districtराज्य

भाजपची मला होती”ऑफर”;आ. गोरंट्याल यांची भाजपाशी जवळीक वाढली.

जालना -काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी ही राजकारणातली दोन टोके आहेत ,परंतु जालन्यात मात्र हे दोन्ही पक्ष हातात हात घालून काम करताना दिसून येत आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल हे आता नेहमीच एका व्यासपीठावर दिसत आहेत.

जालना नगरपालिका ही काँग्रेसच्या ताब्यात आणि विशेष करून नगराध्यक्षपदी आमदार गोरंट्याल यांची पत्नी सौ. संगीता गोरंट्याल या विराजमान होत्या. त्यामुळे आमदार गोरंट्याल यांनी खासदार दानवे यांच्यासोबत हातमिळवणी करून केंद्राच्या अनेक योजना जालन्याच्या विकासासाठी आणल्या. आणि हळूहळू दोघेही एक दुसऱ्याचे गुणगान करायला लागले.

परंतु काल नगराध्यक्षा सौ. संगीता गोरंट्याल यांच्या सत्कार समारंभात आमदार गोरंट्याल यांनी भाजप सोबत असलेल्या संबंधांचं उघडं केलेलं गुपित बरंच काही सांगून जातं.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आणि नगरपालिकेचे पाच वर्षे पूर्ण केल्याबद्दल नगराध्यक्ष सौ. संगीता गोरंट्याल यांचा जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला होता. अर्थातच आमदार बोलणार असल्यामुळे नगराध्यक्ष जास्त काही बोलल्या नाहीत. आ. गोरंट्याल यांनी आपल्या भाषणात भाजपशी असलेली आपली जवळीक उघड करून दाखविली ते म्हणाले” देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. आणि त्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुका होणार होत्या. त्याच वेळी फडणवीस यांनी केलेल्या सर्वेमध्ये काँग्रेसचे सीट पन्नास हजारांनी निवडून येणार आहे असे भाकित वर्तवले होते. आणि ती निवडणूक लढण्यासाठी भाजपा मध्ये यावे अशी ऑफरही दिली होती. परंतु मी विचार करून उत्तर देतो असे सांगितले, आणि मोबाइल बंद करून ठेवला, आणि जालना कडे निघालो. जालना येईपर्यंत मी मोबाईल सुरूच केला नाही. आणि आत्तापर्यंत ज्या पक्षात आहे त्या पक्षाशी गद्दारी करणे योग्य वाटले नाही. “
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button