Jalna Districtबाल विश्वराज्य

क्रीडा प्रबोधिनी कडे विद्यार्थ्यांचा वाढता कल;31 रिक्त जागेसाठी 1 हजार विद्यार्थ्यांनी दिली चाचणी

जालना- जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी विशेष प्रयत्न करून जिल्हा क्रीडा प्रबोधिनी ही संस्था उभी केली.

या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्हा परिषद शिक्षकांनी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी चालवलेली ही संस्था. शासनाचा कुठलाही निधी न घेता जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी जमा केलेला आणि जिल्हा परिषदेच्या उपकार आतून आलेल्या निधीवर ही पूर्ण संस्था चालते. जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांचे मागासलेपण दूर करून त्यांना क्रीडा क्षेत्रात आणण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू बनविण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. 17 जून 2019 रोजी ही संस्था स्थापन झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच covid-19 ही महामारी सुरू झाली आणि या संस्थेचे पहिलं वर्ष वाया गेलं. आता पुन्हा ही संस्था नव्या जोमाने कामाला लागली आहे.  50 मुलं आणि 50 मुली अशा एकूण शंभर  विद्यार्थ्यांची येथे निवासाची व्यवस्था आहे. गेल्या वर्षीच्या कोरोना काळामुळे या संस्थेतील 31 जागा रिक्त झाल्या होत्या. त्यामुळे त्या पुन्हा आता भरण्यासाठी मागील आठवड्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांची शारीरिक चाचणी घेण्यात आली.त्यामध्ये 1015 विद्यार्थ्यांनी आपली चाचणी दिली आहे .यामधून 16 मुलं आणि पंधरा मुलींची निवड होणार आहे. त्या नंतर आणखी दोन चाचण्या या विद्यार्थ्यांच्या होणार असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदाल यांच्या उपस्थितीत अंतिम चाचणी होणार आहे.
*जि. प. शिक्षकांचा हातभार*
ही संस्था सुरू झाल्यानंतर जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शिक्षकाकडून 200 रुपये या प्रमाणे अकरा लाख रुपये जमा झाले होते. त्यानंतर मागील वर्षी प्रत्येकी एक हजार रुपये याप्रमाणे 58 लाख चार हजार रुपये असा एकूण 70 लाख रुपयांचा निधी या जिल्हा परिषद शिक्षकांनी जमा केला होता. त्या निधीवरच ही संस्था सुरू आहे .
*आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्याचे ध्येय* खाजगी शाळेप्रमाणे जिल्हा परिषदेचा विद्यार्थीही कुठेही मागे राहू नये म्हणून कबड्डी खो-खो अथलेटिक्स या तीन क्रीडा स्पर्धा मध्ये अंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्याचे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. परिसरामध्ये विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी सुसज्ज मैदानही आहे .
*हे शिक्षण घेत आहेत परिश्रम* वरिष्ठ क्रीडा प्रशिक्षक प्रमोद खरात, गृह प्रमुख विजय खेडेकर, राजू पुरी, बाललक्ष्मी टेड्डी,  प्रशिक्षक सचिन दोडके, रवींद्र ढगे, संतोष मोरे . आणि मैदान सेवक म्हणून योगेश भुतेकर हे कार्यरत आहेत.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button