जालना जीप, नपच्या आरोग्य विभागात 116 रिक्त पदांसाठी भरती

जालना जिल्हा परिषद मध्ये राष्ट्रीय अभियानांतर्गत मंजूर असलेल्या रिक्त कंत्राटी तत्वावरील विविध पदांसाठी, तसेच राष्ट्रीय नागरिक आरोग्य अभियान नगर परिषद जालना अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जालना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जाहिरात काढली आहे.
वैद्यकीय अधिकारी, (एमबीबीएस), दंत शल्यचिकित्सक, आर. बी. एस. के. आयुष्य पदे ,स्टाफ नर्सेस, लेखापाल, अशा विविध पदांसाठी ही जाहिरात आहे. एकूण 116 पदे भरण्यात येणार आहेत. या पदांची अधिक माहिती www.jalna.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी गुरुवार दिनांक 13 जानेवारी पर्यंत अर्ज करावेत असे आवाहन, च जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ, विवेक खतगावकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ, अर्चना भोसले जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक रावसाहेब शेळके, यांनी केले आहे.कमीत कमी 17हजार ते जास्तीत जास्त एक लाख 25 हजार रुपयांपर्यंत निवड झालेल्या उमेदवारांना मानधन मिळणार आहे.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna