वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर
वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन! त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा कु. किर्ती वाणी यांनी लिहिलेला हा विशेष लेख वाचकांसाठी सादर.
*-दिलीप पोहनेरकर,9422219172*
*************************************
मराठी पत्रकारितेचा पाया भक्कम पणे उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले, त्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची आठवण म्हणून 6 जानेवारी हा दिवस” दर्पण दिन “म्हणून साजरा केला जातो. सुधारकांच्या पहिल्या पिढीने पाश्चात्त्य विद्या व शिक्षण आत्मसात करून नवी जीवन मूल्ये वृत्तपत्र माध्यमाद्वारे रुजवली. त्या परंपरेचा पाया बाळशास्त्री जांभेकरांनी घातला.
बंगाल मध्ये राजा राम मोहन रॉय यांनी सुधारक सुधारणांचे नवयुग आरंभिले तेच कार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात नवविचारांची लाट निर्माण करण्यासाठी केले. प्रयत्नशील व वैचारिक चळवळ सुरू करून त्यांनी समाज सुधारणा व शिक्षणाची अभिव्यक्ती हेच आपले जीवन कार्य मानले. त्या निमित्ताने हा विशेष लेख आहे.
अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतीला सामोरे जाऊन त्यांनी 6 जानेवारी 1832 या रोजी “दर्पण” हे वृत्तपत्र सुरू केले, त्यामुळे त्यांना मराठी वृत्तपत्र सृष्टीचे ‘ जनक ‘ म्हणून ओळखले जाते . व तसेच हा दिवस महाराष्ट्रात “दर्पण दिन” म्हणून साजरा केला जातो. 1832 ते 2022 या एवढ्या वर्षांच्या काळामध्ये मराठी पत्रकारितेन अनेक उतार-चढाव अनुभवले आहे .
स्वातंत्र्य चळवळीत राजकीय भान निर्माण करणारी तसेच अनेक सामाजिक बदलांसाठी आग्रही राहणारी ते आताची 24×7 पत्रकारिता… व पेन ते काँप्युटर, खिळे जुळवण्यापासून सुरू झालेली ते आता डिजिटल प्रिंटिंग, मुद्रित माध्यमं, टीव्ही चॅनेल्स ते हातातल्या मोबाईलवर वेळोवेळी येणारे अपडेट्स…अश्याप्रकारे दिवसेंदिवस पत्रकारिता बदलत चालली आहे. या बदलांशी स्वतःला जुळवून घेताना माध्यमांना अनेक आव्हानांचाही सामना करावा लागला असून तसेच आजही सामना करावा लागत आहे. ही आव्हानं नेमकी काय आहेत? आणि ते कश्या प्रकारे त्या आव्हानांना सामोरे जाता हे आपण थोडक्यात या लेखातून वाचणार आहोत .
प्रिंट, टीव्ही किंवा इतर कुठलाही प्लॅटफॉर्म पूर्णपणे संपणार नाही. पण टीव्ही चॅनेल्स असो की वृत्तवाहिन्या यांच्यासमोरचं आज सर्वांत मोठं आव्हान म्हणजे लोकांच्या टीव्ही पाहण्याच्या सवयींमध्ये होत असलेला बदल कारण 25 वर्षांपूर्वी परिस्थिती अशी होती, की लोक आदल्या दिवशी घडलेल्या गोष्टी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात वाचायचे. त्यानंतर एक काळ असा होता, की दिवसभरात घडलेल्या गोष्टी संध्याकाळी टीव्हीवर बघितल्या जायच्या. नंतर काही काळानंतर एखादी घटना घडली, की लगेच दिसायला लागली. आता टीव्ही किंवा वर्तमानपत्राची बातमी ब्रेक करण्याची क्षमता कमी होत चाललीये.कारण आता बातम्या सोशल मीडियावर ब्रेक होत आहेत. माध्यमांमधले हे बदल अनुभवताना आता पत्रकारितेच भविष्य हे डिजिटल आणि व्हीडिओ असणार आहे असे वाटायला लागले आहे. कारण आजकाल मोबाईल टीव्ही हे आता माहितीचं प्रमुख माध्यम असेल आणि व्हीडिओ हा त्याचा महत्त्वाचा भाग असणार आहे. कारण लोकांना आता वाचण्यापेक्षा पाहणं हे जास्त सोपं आणि इंटरेस्टिंग वाटू लागले आहे .त्यामुळेच व्हीडिओ हे येत्या काळात महत्त्वपूर्ण ठरतील का ? अशी शक्यता वाटत आहे .
सध्याच्या काळात प्रिंट-टीव्ही डिजिटल हे भेद तितके काटेकोर राहिले आहेत असं मला वाटत नाही. आता वेगवेगळे माध्यमसमूह हे या तिन्ही माध्यमांचा समतोल साधताना दिसत आहेत. दिवसेंदिवस मोबाईल वरील फेसबुक, ट्वीटर, टिकटॉक अश्या विविध प्रकारचे अँप्स येत असल्याने दर दीड-दोन वर्षांनी आता अभिव्यक्तीसाठी वेगळं माध्यम येत आहे. पूर्वी वर्तमानपत्रामध्ये मजकूर तयार करणारा संपादकीय विभाग असायचा आणि तो वाचकांपर्यंत पोहोचवणारा वितरण विभाग असे ठळक स्वतंत्र विभाग असायचे. पण आजकाल डिजिटल माध्यमांच्या काळात कन्टेन्ट तयार करणं आणि तो वाचकांपर्यंत पोहोचवणं ही आता एकाच व्यक्तीची जबाबदारी झाली आहे , ज्याला आपण ‘target audience’ म्हणतो व त्याचा विचार करून कोणता कन्टेन्ट कधी तयार करायचा तसेच तो कोणत्या वाचकापर्यंत पोहोचवायचा ही देखील एकाच व्यक्तीची जबाबदारी असते. माझ्यामते हेच आता मराठी पत्रकारितेसमोरचं आव्हान आहे . पत्रकारितेचं स्वरुप बदलत असलं तरी पत्रकारितेतली मूळ मूल्यं कायम आहेत . बदलत्या माध्यमांच्या स्पर्धेत स्वतःला तयार कसं करणार हे आजच्या पत्रकारांसमोरचं प्रमुख आव्हान आहे. .माहिती-तंत्रज्ञानाच्या विस्फोटाच्या वातावरणात आता नवीन तरुण पिढीला पत्रकारितेमध्ये अनेक संधी आहेत.
कु. किर्ती राजेंद्र वाणी,
एम. जी. एम. कॉलेज ऑफ जर्नालिझम
औरंगाबाद