मंगळवारी झालेल्या दोन गटातील हनामारी मधील फरार आरोपींना पोलिसांनी पकडले
जालना- शहरातील उडपी हॉटेल परिसरात मंगळवार दिनांक चार रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर पूर्ववैमनस्यातून एका जमावाने तलवारीने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते. त्यानंतर दिवसभर शहरातील वातावरण तणावपूर्ण शांततेत होते आणि सायंकाळी उशिरा यासंदर्भात गुन्हाही दाखल झाला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणातील आरोपी फरार झाले होते.आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके स्थापन करण्यात आली होती त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांचा समावेश होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज दि.6 रोजी मध्यप्रदेशातील बर्हाणपूर येथील एका लॉजवर छापा मारून लपून बसलेल्या पाच फरार आरोपींना पहाटे 6 वाजता ताब्यात घेतले आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये केदार गोपाल भुरेवाल, हरीश लखन भुरेवाल, विजय गणेश गोमतीवाले, यश संजय फतेलष्कर आणि आकाश उर्फ अक्षय प्रकाश पाटोळे यांचा समावेश आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, पोलीस कर्मचारी सॅम्युएल कांबळे, गोकुळसिंग कायटे, प्रशांत देशमुख, विनोद गडदे, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, सुधीर वाघमारे, सचिन राऊत, सुरज साठे यांनी ही कारवाई केली.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna