संक्रांतीनिमित्त “मैत्र मांदियाळी” ची महिलांसाठी विशेष योजना
जालना- चार दिवसार संक्रांत आलेली आहे, आणि महिलांच्या आवडीचा असलेल्या या सणाचे नियोजन पूर्ण होत आहे. यामध्ये महत्त्वाचं नियोजन असतं ते हळदीकुंकवासाठी येणाऱ्या सुवासिनींना भेटवस्तू म्हणून कोणती वस्तू द्यायची? यावर मैत्र मांदियाळीने सुंदर योजना सुरु केली आहे. ती म्हणजे अल्पदरात फुलांची रोपे उपलब्ध करून दिले आहेत.
अन्य वेळी भांडी घासणी, चहा गाळणी, शाम्पूच्या पुड्या, साबण, चमचे ,अशा विविध प्रकारच्या वस्तू महिला भेटवस्तू म्हणून देतात, परंतु मागील वर्षांपासून महिलांमध्ये वृक्षलागवडीची आवड निर्माण व्हावी आणि त्यानिमित्ताने निसर्गाचीही जोपासना व्हावी या हेतूने मैत्र मांदियाळी या सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या या संस्थेने महिलांसाठी संक्रांतीनिमित्त ही योजना आहे.
एकाच वेळेस विविध प्रकारची 15 रोपे खरेदी केल्यास ना नफा ना तोटा या तत्त्वावर वीस रुपयांना हे रोप मिळणार आहे. त्यामुळे आप्तेष्टांच्या घरासमोर सुशोभीकरण होऊन वृक्षाविषयी आवडही निर्माण होणार आहे, आणि आपण दिलेल्या भेटवस्तूची सार्थकता ही होणार आहे. गेल्या वर्षी पासून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या उपक्रमाला हातभार म्हणून महिला बचत गटांनी तयार केलेली कापडी पिशवी देखील एका रोपा सोबत एक मोफत देण्यात येणार आहे .
अजय किंगरे, ज्ञानेश्वर सातपुते, कैलास शिंदे, अनिल कुलकर्णी, निवृत्ती रुद्राक्ष ,संदीप मोहरील, सुनील शेळके, संदीप ठगे, आणि तुषार सोळंके हे हा उपक्रम राबवत आहेत.
*ही आहेत रोपे*
तुळस, जेट्रोफा,तगर,यलो आलमोंडा, कण्हेर, कावडी, गुलाब, शेवंती, पेंटास, अनंता, सदाफुली,काकडा, क्रोटोन, मोगरा, रातराणी, जुई, साल्व्हिया,कोडीया, मनीप्लँट,एकझोरा, ड्रेसेना, स्पायडर, बेबी टियर, ग्रीन अरेलिया, ब्लॅक अरेलिया, पिटोनिया, ऑफिस टाईम, जास्वंद, बुच,कुंदा, पेंटास, आंबा, सीताफळ, आवळा, जांभूळ,गवती चहा, बांबू, चंदन, शमी, शिसम,करंज, कडूलिंब, कडीपत्ता
इत्यादी रोपे उपलब्ध आहेत.
*मिळण्याचे ठिकाण*
मैत्र मांदियाळी रोपवाटिका, निलम टॉकीज शेजारी, रेल्वे स्टेशन- मस्तगड रोड ,जुना जालना, 942227579, 9403445538
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna