Jalna District

दारू चालू, मॉल चालू ,मग शाळाच बंद का ?इंग्रजी माध्यमांचे संस्थाचालक आणि शिक्षक संतापले

जालना- दारू चालू, मॉल चालू, रेस्टॉरंट चालू ,हे सर्व 50 टक्के चालू असताना इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद का? असा संतप्त सवाल इंडिपेंडेंट इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या वतीने राज्याचे आरोग्य मंत्री तथा जालना चे पालकमंत्री राजेश टोपे यांना विचारला आहे. माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या माध्यमातून या सर्व शिक्षकांनी श्री. टोपे यांची भेट घेतली आणि आपली कैफियत मांडली.

दरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा पूर्ण बंद न  करता ज्या भागामध्ये covid-19 तिचा प्रादुर्भाव जास्त आहे तिथं 50 टक्के उपस्थिती वर शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, ज्या शहरात किंवा गावात प्रादुर्भाव कमी आहे अशा ठिकाणी शंभर टक्के शाळा सुरू ठेवाव्यात, तसेच शासनाने जर शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असेल आणि तो ठाम असेल तर इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांना प्रति महिना दहा हजार रुपये लॉकडाउन भत्ता देऊन त्यांची होणारी उपास मार थांबवावी.

अशी मागणी या संघटनेच्या वतीने आरोग्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे. इंडिपेंडेंट इंग्लिश स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष भारत भांदर्गे यांच्यासह शहरातील बहुतांशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे संस्थाचालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

Related Articles