डोमेगावच्या ध्येयवेड्या दाम्पत्याचं गावातील महिलांसाठी हळदीकुंकू
जालना- अंबड तालुक्यातील डोमेगाव येथे ग्रामपंचायत मध्ये पाणी पुरवठा करणारे कर्मचारी बाबासाहेब शेळके हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी उपक्रमामुळे चर्चेत असतात. आज शेळके दांपत्याने गावातील महिलांसाठी संक्रांतीनिमित्त सामूहिक हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमात बाबासाहेब शेळके आणि सौ. सविताबाई शेळके या दाम्पत्याने या महिलांना वाण म्हणून सॅनिटायझरची बॉटल, एक मास्क आणि पेरूचे रोप दिले आहे. स्वतः पत्राच्या घरात राहणाऱ्या या दाम्पत्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे याविषयी बाबासाहेब शेळके यांची पत्नी सविताबाई शेळके म्हणाल्या, की त्यांच्या सुखातच, त्यांच्या आनंदातच मला आनंद आहे. त्यामुळे त्यांनी यापूर्वी माझं मंगळसूत्र मोडून गावची सेवा केलेली आहे. मात्र याबद्दल मला वाईट वाटत नाही. हा सर्व खर्च ते स्वतःच्या खिशातूनच करतात. केवळ समाजसेवेची आवड आणि निसर्गाशी असलेलं आपलं नातं टिकून ठेवण्याचा त्यांचा हा छंद आहे. यापूर्वी देखील त्यांनी स्वतःची शेती विकून गावात त्यांनी 205 घरांसाठी शौचालय बांधून दिली आहेत. त्यानंतर वृक्ष लागवड हे तर नित्याचीच बाब आहे .
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna