खणेपुरीत साकारत आहे महानुभाव पंथाचे 108 कोटी नामस्मरण मंदिर
जालना- सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भारध्वजावेध तीर्थस्थान श्रीकृष्ण नाथ महानुभाव देवस्थान खणेपुरी,( तालुका जालना) येथे संकल्पित केलेल्या 108 कोटी नामस्मरण मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा रविवार दि. सोळा रोजी पार पडला. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते या मंदिराच्या पायाभरणीचा शुभारंभ झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आचार्य श्री लोणारकरबाबा , अध्यक्ष अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद , ध्वजारोहण हस्ते आचार्य श्री नागराज बाबा अध्यक्ष अखिल भारतीय महानुभाव परिषद , आचार्य श्री साळकर बाबा, आचार्य श्री जामोदेकर बाबा कार्यक्रम आयोजक महंत श्री प्रज्ञासागरबाबा महानुभाव ,यावेळी राज्यातील श्रीकृष्ण महानुभाव पंथांचे महंत उपस्थित होते या मंदिराच्या उभारणीसाठी भक्तांकडून निधी न घेता प्रत्येकाचा हातभार या मंदिराला लागावा या उद्देशाने एक दगड घेतले जात आहे आणि या दगडच्या माध्यमातून हे मंदिर उभे राहणार आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे 20 हजार दगडांची आवश्यकता असून आत्तापर्यंत दीड हजार दगड जमा झाले आहेत. आणि उर्वरित दगडा साठी भाविकांनी नाव नोंदणीही केलेली आहे. पुढील टप्प्यांमध्ये आता या भाविकांकडून या दगडाची मागणी केली जाणार आहे.*मंदिराचा इतिहास* श्रीक्षेत्र खनेपुरी हे जालना तालुक्यातील एक ठिकाण आहे. कार्तिक शुद्ध 3 शके 1990 (म्हणजे इसवी सन 1268 मध्ये) सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी येथे आले होते. असा उल्लेख लीळाचरित्रात आहे.या मंदिराच्या उभारणीसाठी पाच टप्पे निश्चित केले होते ते हे पाच टप्पे
1- नियोजित 108 कोटी नामस्मरण मंदिरासाठी 108 फूट लांब, 108 फूट रुंद आणि बारा फूट उंच चौथऱ्यावर या मंदिराचे बांधकाम करायचे आहे. त्यामुळे सर्वप्रथम ही जागा उपलब्ध करून घ्यावी लागली.
2- मंदिरासाठी आवश्यक असणारा 108 कोटी नामस्मरण जप देशाच्या विविध भागांमध्ये जाऊन तो करून घेणे. यासाठी 15 राज्यांमध्ये प्रवास करण्यात आला.
3- बाराव्या वर्षी 16 जानेवारी 2014 रोजी श्री क्षेत्र पांचाळेश्वर येथील गंगेच्या पात्रात हजारो श्रद्धावानांनी नामस्मरण जप श्रीदत्तप्रभूंचे चरणी श्रद्धा भावाने समर्पित केला.
4- सन 2002 पासून ते 2014 पर्यंत बारा वर्षांमध्ये नामस्मरण करून दगडाचे दान देणाऱ्या दीड हजार भाविकांनी आपले दान मंदिरा कडे जमा केले.
5 -ज्या भाविकांनी नामस्मरण करून मंदिरासाठी दगड दान केलेला आहे अशा भाविकांकडे जाऊन या दगडांचे दान स्वीकारणे आणि त्यांना दानपत्र देणे.
अशा या पाच टप्प्यांमध्ये 108 कोटी नामस्मरण मंदिराचा उपक्रम राबविला जात आहे.
पायाभरणीच्या मुहूर्ताला श्री सर्वज्ञ सेवा भजनी मंडळ पुंडलिक नगर, औरंगाबाद, मनोज उकर्डे आणि त्यांच्या संचाने इथे सहभाग नोंदवला .तसेच श्री दत्त सांप्रदायिक भजनी मंडळ अंतरवाली सराटी येथील संजय रोडी, सारांश दखणे, दिलीप दखणे, दिलीप कोटंबे, मनीष टोपे, बाबासाहेब रोडी, आणि भजन मंडळाने आपले भजन सादर केले.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna