पुन्हा सुरू झाले कोरोना नियंत्रण कक्षाचे काम; स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित: जिल्हा कचेरीत जाण्यापूर्वी करावी लागणार तपासणी
जालना- जिल्हा कचेरीत प्रवेश करण्यापूर्वी आता प्रत्येकाला कोरोना विषयी ची तपासणी करावी लागत आहे . तसेच जिल्हा कचेरी मध्ये आपत्ती व्यवस्थापण अंतर्गत कोरोना नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. एक दूरध्वनी आणि पाच भ्रमणध्वनी उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्यामुळे आता कुठल्या नंबर वरून कोरोना लग्नाला फोन येईल हे सांगता येणे अवघड आहे.
अशा पद्धतीने कोरोना बाधित रुग्णाला संपर्क नियंत्रण कक्षातून केला जात आहे. या कक्षामध्ये आता पूर्वीप्रमाणेच पुन्हा एकदा कार्यप्रणाली सुरू झाली आहे. एक डॉक्टर आणि त्यांना अन्य काही सहकारी, त्यासोबत सहाय्यक नोडल ऑफिसर अशा विविध जबाबदाऱ्या देण्यात आले आहेत. सकाळी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कडून कोरोना बाधित रुग्णांची आलेली यादी तपासून त्यांच्याशी संपर्क करणे आणि त्यांना पुढील औषधोपचारासाठी प्रवृत्त करणे हे या कोरोना नियंत्रण कक्षाचे काम आहे.
आठवड्यातील सात दिवस 24 तास हा कक्ष सुरू आहे. त्यासाठी वेगळा कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला आहे. दिवसभराची इत्यंभूत माहिती देखील या नियंत्रण कक्षात आहे. आज पर्यंत रुग्ण संख्या खाटांची संख्या ही इथे उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी, तसेच काही तक्रार असल्यास पुढील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 02482-223132 तसेच रुग्णांशी संपर्क साधण्यासाठी या कक्षामध्ये पाच स्वतंत्र भ्रमणध्वनीची व्यवस्था करण्यात आली आहे. आणि सध्या या कक्षाचे प्रमुख म्हणून अरुण देशमुख सहाय्यक नोडल अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन , हे काम पाहत आहेत.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna