Jalna District

डायल वन वन टू चा 664 नागरिकांना दिलास

जालना- लुटमार, अतिवृष्टी, आग, अपघात, चोऱ्या, अशा कोणत्याही संकटामध्ये ,आपत्तीमध्ये नागरिकांना त्वरित दिलासा मिळावा या उद्देशाने शासनाने सुरू केलेल्या “डायल वन वन टू” या नवीन योजनेमुळे 664 नागरिकांना दिलासा मिळाला आहे. एम. डी. टी. (मोबाईल डाटा टर्मिनल) वरून दिल्यामुळे सरासरी 98% नागरिकांना याचा फायदा झाला तर दोन टक्के नागरिकांना बिनतारी संदेश यंत्रणेमार्फत संपर्क करण्यात आला.

जालना जिल्ह्यात दिनांक 23 सप्टेंबर रोजी डायल वन वन टू (112)ही सेवा सुरू करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्याकडे ही सर्व जबाबदारी आहे. त्या दिवसापासून आत्तापर्यंत 664 नागरिकांनी वन वन टू डायल करून या सेवेचा फायदा घेतला आहे. ग्रामीण भागात ही सेवा सरासरी 42 मिनिटांपर्यंत पोचली तर शहरी भागात सरासरी 18 मिनिटापर्यंत गरजूंना मदत मिळाली आहे. या यंत्रणेकडे सध्या 58 एम. डी. टी. आहेत .त्यापैकी 30 दुचाकीवर आणि 28 पोलिसांच्या चार चाकी वाहनावर बसवलेले आहेत. त्यामुळे गरजूंना विनाविलंब मदत मिळते. आत्तापर्यंत 450 पोलिसांना याविषयी प्रशिक्षण दिले आहेत तर अन्य 35 अधिकाऱ्यांना एम.डी.टी. हाताळण्याचे प्रशिक्षण दिले आहे. या यंत्रणेत काही बिघाड झाली तर महिंद्रा डिफेन्स चे दोन सॉफ्टवेअर इंजिनियर येथे कायमस्वरूपी कार्यरत आहेत.
* दोघांवर गुन्हे*
डायल वन टू करून खोटी माहिती दिल्याबद्दल जालना आणि भोकरदन तालुक्यात प्रत्येकी एक यानुसार दोघा जणांवर खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
* महिलांचा जास्त समावेश*
आपत्तीमध्ये सापडल्यानंतर तात्काळ मदत मिळण्यासाठी असलेल्या या “महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली”चा उपयोग घेण्यामध्ये महिलांचा जास्त समावेश आहे. आत्तापर्यंत आलेल्या 664 कॉल पैकी 400 कॉल महिलांचे आहेत.
* अशी चालते प्रणाली* आपत्तीमध्ये सापडलेल्या नागरिकाने 112डायल केल्यानंतर त्या ठिकाणच्या भौगोलिक रचनेप्रमाणे ही माहिती नवी मुंबई किंवा नागपूर येथे असलेल्या मुख्य कार्यालयात दिल्या जाते. तेथून तत्परतेने संबंधित जिल्ह्याच्या पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली जाते. पोलिस नियंत्रण कक्षातून काही क्षणातच ही माहिती जीपीआरएस प्रणालीद्वारे मोबाईल डेटा टर्मिनल वरून यंत्रणेला दिली जाते .त्यामुळे घटना स्थळाच्या जवळ असलेली मोबाईल डेटा टर्मिनल चे वाहन संबंधित गरजू नागरिकापर्यंत पोहोचून त्याला तात्काळ मदत मिळते.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button