Jalna District

घराशेजारी असलेल्या खदानीत उडी मारून तरुणाची आत्महत्या

 जालना- शहरापासून काही अंतरावर असलेल्या खरपुडी रस्त्यावरील एका खदानी मध्ये रूपचंद सावरमल अग्रवाल या 30 वर्षीय तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्घटना आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली.

मंठा वळण रस्त्यावर सरस्वती मंदिराजवळ मोरया नगर आहे. या नगरा मध्ये रूपचंद सावरमल अग्रवाल वय 30 हा युवक त्याची आई, भाऊ,  भावजय सह राहत होता. प्राप्त माहितीनुसार गेल्या अनेक महिन्यांपासून त्याच्या हाताला काम नव्हते. आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्याच्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या खदानी मध्ये त्याने उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली. दरम्यान ही माहिती पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सय्यद मजीद, सुरेश खाडे, किशोर जाधव, यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आणि पुढील सूत्रे हलवली .

दरम्यान एक वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले खदानीमध्ये पाणी भरपूर असल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी गळ टाकून मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तो हाती लागत नव्हता, त्यामुळे पुन्हा विहिरीतील पाणी उपसण्याची मोहीम सुरू झाली, आणि शेवटी दुपारी एक वाजता सुरू झालेली ही शोध मोहीम जीवाची पराकाष्ठा करून सायंकाळी साडेसहा वाजता मृतदेह शोधल्या नंतरच थांबविली. सागर गडकरी, संतोष काळे, राहुल नरवाडे, अशोक खाडे, विनायक चव्हाण, या जवानांनी हा मृतदेह शोधून काढला. दरम्यान रूपचंद अविवाहित असून त्याच्या पश्चात आई, भाऊ भावजय असा परिवार आहे.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button