Jalna District

सदर बाजार पोलिसांचा झन्ना- मन्ना जुगारावर छापा

जालना-पोलीस स्टेशन सदर बाजार जालना अंतर्गत कादराबाद पोलीस चौकी  हद्दीत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक  परशुराम पवार यांना गोपनीय  माहिती मिळाली होती की लोधी मोहल्ला येथे काही लोक गोलाकार बसून झना मन्ना नावाचा जुगार खेळ खेळत आहेत

त्यांनी वरिष्ठांना कळवून मिळालेल्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी ,  पोलीस व पंच  सोबत घेऊन ठीक चार वाजेच्या सुमारास  छापा मारला असता , तेथे काही लोक गोलाकार बसून पत्ते खेळत असल्याची खात्री झाल्याने  त्यांना जागीच बसवून त्यांचे नाव गाव विचारले.   गोपालसिंग मेघासिंग राजपूत वय 40 वर्ष राहणार लोधी मोहल्ला जालना ,अनिल उर्फ हरी किसनराव सुपेकर वय 39 वर्ष राहणार गुंडेवाडी तालुका जिल्हा जालना,सय्यद नजीर सय्यद मुजम्मिल वय 45 वर्ष राहणार हनुमानघाट जालना,शेख जमील शेख शरीफ वय 23 वर्ष राहणार वाल्मिक नगर जालना,दीपक सुभाष अवसारे वय 27 वर्ष राहणार लोधी मोहल्ला जालना, त्यांच्या ताब्यात नगदी 1640 रुपये व जुगाराचे साहित्य मिळून आल्याने, तसा पंचनामा करून त्यांच्याविरुद्ध   परशुराम पवार यांनी सरकार तर्फे फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक  श्रीमती सिंधू खर्जुले या करीत आहे.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

Related Articles