…ग बाई मी पतंग उडवीत होते, माहेश्वरी महिला मंडळाचा पतंगोत्सव
जालना- संक्रांत ज्याप्रमाणे तिळगुळाचा गोडवा घेऊन येते त्याचप्रमाणे पतंग उडवणाऱ्या प्रेमींसाठी देखील उत्साहाचे वातावरण घेऊन येते. या संक्रांतीच्या निमित्ताने पतंग उडविण्याची एक परंपरा आहे आणि ही परंपरा जालना जिल्हा माहेश्वरी महिला महामंडळाने कायम ठेवली आहे.
येथील श्रीमती दांकुंवर महीला महाविद्यालयाच्या प्रांगणावर असाच पतंगोत्सव मंगळवारी सायंकाळी रंगला होता. जालना जिल्हा माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा निर्मला साबू सचिव मीनाक्षी दाड, कोषाध्यक्ष सरोज करवा, निर्मला लड्डा, सपना मुंदडा यांच्या पुढाकारातून ही पतंग बाजी सुरु झाली. यामध्ये सहा गटांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये कविता लखोटिया- प्रीती राठी ,राधिका सारस्वत- शितल तिवारी, प्रीती मानधनात- तेजस मानधना, मोनिका राठी- सरिता पंच ,अनुराधा लड्डा- प्रीती तिवारी आणि सहावा संच होता तो सुजाता व्यवहारे आणि शीला व्यवहारे यांचा. पतंगाचा दोरा कधी हातात न धरणार्या महिलांनी देखील आपले पतंग हवेत उडविण्याचा प्रयत्न केला.
यामध्ये यश आले ते कविता लखोटिया आणि प्रीती राठी यांना. त्यांनी पहिला क्रमांक पटकाविला तर दुसरा क्रमांक राधिका सारस्वत आणि शितल तिवारी यांचा आला. परीक्षक म्हणून निधी आणि तृप्ती शहा या दोघींनी काम पाहिले.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna