राज्य

आजी- माजी- विद्यमान आमदाराला डावलून मंठेकरांच शिवसेनेला  बहुमत

जालना- जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या मंठा नगरपंचायत च्या 17 जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये मंठेकरांनी काँग्रेसच्या आजी-माजी आमदार तथा पिता-पुत्रांना डावलून विद्यमान भाजपच्या आमदारालाही बाजूला सरकवले आणि शिवसेनेला साथ देत 17 पैकी 12 उमेदवार निवडून आणत निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे.

विशेष म्हणजे राज्याचे बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी मंठा  येथे सभा घेऊन काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन केले होते, आणि आपण विद्यमान आमदार राजेश धोंडीराम राठोड यांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी मंठाच्या विकासासाठी देऊ असे आश्वासन दिले होते.  या आश्वासनाकडे मंठेकरांनी पाठ फिरवली. यापूर्वी देखील माजी आमदार धोंडीराम राठोड  असताना विकास झाला नाही, आता त्यांचे पुत्र राजेश राठोड हे तरी काय  करणार? असा प्रश्न विचारत त्यांच्या या आश्वासनाला न भुलता शिवसेनेला जवळ केले आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव लोणीकर यांचा हा मतदारसंघ आहे.  काँग्रेसला निवडून आणण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रामकिसन ओझा, माजी आमदार तथा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश कुमार जेथलिया, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, अन्वर बापू देशमुख, यांनी प्रयत्न केले होते परंतु हे प्रयत्न वरवर  होते की काय? असा प्रश्न आता या निकालामुळे पडलेला आहे. कारण आ. राजेश राठोड यांचे आणि सुरेश जेथलिया यांचे जमत नसल्याचे उघडउघड वक्तव्य निवडणुकीच्यावेळी व्यासपीठावरून केले गेले होते. शिवसेनेची सत्ता येणार याचे सूतोवाच मतदानापूर्वी झाले होते. कारण प्रभाग क्रमांक 10 मधून भारतीय जनता पक्षाच्या सुनिता बाळासाहेब गायकवाड आणि शिवसेनेच्या मीना सचिन बोराडे या दोघींनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी सुनिता गायकवाड यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेनेच्या मीना बोराडे या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

पक्षीय बलाबल असे शिवसेना 12, राष्ट्रवादी काँग्रेस 1, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 2, आणि भारतीय जनता पक्ष दोन असे एकूण 17 उमेदवार निवडून आले आहे.
*सविस्तर निकाल*

प्रभाग क्रमांक 1 बोराडे अच्युत,शिवसेना513/652                         2 पठाण बाज गुलाम, राष्ट्रवादी काँग्रेस 227/ 975.
3 शेख साजिद जलील काँग्रेस, 303/ 627
4 राठोड नंदा उत्तमराव शिवसेना, 695/ 980
5 बोराडे दीपक आसाराम शिवसेना, 391/ 684
6 दवणे यमुना शेषनारायण भाजपा, 300/ 671
7 वाघमारे छाया अरुण, शिवसेना 392 /906
8 खंदारे अशोक रावसाहेब काँग्रेस ,593/ 648
9 खाटीक दुरम रशीद शिवसेना, 554/ 892
11 बागवान खय्युम यासीन शिवसेना, 506 /790 ,
12 बोराडे वंदना वैजनाथ शिवसेना, 986/ 1028                       13 बोराडे मिरा बालासाहेब,शिवसेना, 510/ 542
14  बोराडे सुषमा प्रदीप शिवसेना 558/ 594 .
15 बोराडे सरोज प्रल्हाद,शिवसेना 329/ 691
16 बोराडे शोभा प्रसाद भाजपा, 492/ 746 .
17 सूर्यवंशी रेणुकादास शिवसेना 443/ 817.
*ए. जे.बोराडे यांच वजन वाढलं* मंठा तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे सक्रिय आणि एकनिष्ठ जिल्हाप्रमुख म्हणून ए. जे. बोराडे यांचे नाव आहे. आत्तापर्यंत विधानपरिषद सदस्य माजी आमदार धोंडीराम राठोड, त्यानंतर त्यांचे चिरंजीव विद्यमान विधानपरिषद सदस्य आमदार राजेश राठोड, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया ,हे तिघेही काँग्रेसचे आहेत. भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव लोणीकर यांचा हा मतदारसंघ आहे. आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी मंठा मध्ये कार्यरत आहे. अशा दिग्गज आजी-माजी आमदारांचा हा मतदार संघ असतानादेखील मंठा नगरपंचायत वर शिवसेनेचे निर्विवाद बहुमताने वर्चस्व स्थापन करणाऱ्या ए. जे. बोराडे यांचे वजन जनतेच्या दरबारात वाढल्याची ही लक्षणे आहेत.

निवडणुक प्रचारादरम्यान मंत्री अशोकराव चव्हाण यांनी केलेले भाषण(संग्रहित)

*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button