Advertisment
Jalna District

अल्पवयीन सायकल चोरांच्या टोळीकडून 1 लाख 30 हजारांच्या 10 सायकल जप्त

जालना- घरातील सर्वच सदस्यांना वापरता येण्यासाठी 25 हजारांची महागडी सायकल महेश सिताराम धन्नावत यांनी दीड महिन्यापूर्वी खरेदी केली होती. ही सायकल दिनांक 17 जानेवारीच्या संध्याकाळी त्यांच्या घरा समोरून चोरीला गेली.  त्यासंदर्भात सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान सायकल चोरून नेणारा हा सीसीटीव्ही  कॅमेरात कैद झाल्यामुळे पोलिस यंत्रणा ही लगेच कामाला लागली.  पहाता पहाता हा तपास करत असताना तीन अल्पवयीन मुलांची टोळी हाताला लागली आहे. या टोळीकडून सदर बाजार पोलिसांनी एक लाख तीस हजाराच्या दहा सायकल जप्त केल्या आहेत .सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर  पायघन यांनी दिलेल्या सूचनेनुसार विशेष शाखेचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांचे पथक कामाला लागलं . सीसीटीव्हीच्या आधारे सायकल चोराचा तपास करत असताना सायकल चोरी करणारा हा अल्पवयीन मुलगा असून बस स्थानक परिसरात असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिस यंत्रणा कामाला लागली आणि पाहता पाहता या सायकलचा शोध घेत असताना अन्य तीन सायकल चोर हाती लागले, मात्र हे सर्व च्या सर्व अल्पवयीन आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून सायकल हस्तगत करत असताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. या मुलांचे पालक पोलीस ठाण्यात जमा होऊ लागले.

दरम्यान 17 तारखेला महेश  यांचा दहा वर्षाचा मुलगा कुबेर  हा ही आधुनिक गेरची असलेली सायकल घेऊन जे.ई. एस. महाविद्यालयात खेळण्यासाठी गेला होता, आणि खेळून आल्यानंतर त्याने ही सायकल घरासमोर लावली.  पहाता- पहाता एका तासातच ही सायकल गायब झाली. सायकलच्या वर्णनानुसार पोलिसांनी तपास केला असता हा सायकल चोर हाती लागला आहे. त्याने दिलेल्या माहितीवरून अन्य काही ठिकाणी तपास केला असता इतर दोघे ही पोलिसांना हाती लागले आहेत. असे एकूण तीन अल्पवयीन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत .त्यांच्याकडून पंचवीस हजाराच्या दोन सायकल आशा एकूण पन्नास हजाराच्या दोन आणि अन्य आठ सायकल असा एकूण एक लाख तीस हजारांच्या सायकल जप्त केल्या आहेत.
या विशेष पथकामध्ये रामप्रसाद रंगे, रामेश्वर जाधव, सुभाष पवार, सोमनाथ उबाळे, अनिल काळे, जगन्नाथ जाधव, धनाजी कावळे, यांचा समावेश होता.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button