Jalna District

“त्या” भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

जालना – भाजपा युवा मोर्चा व युवती मोर्चाच्यावतीने विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक महाराष्ट्र सरकारने मागे घ्यावे या मागणीसाठी प्रा. सुजीत जोगस यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आले होते. जिल्ह्यात लावण्यात आलेल्या जमावबंदी आदेश झुगारून आणि कोव्हीड 19 नियमांचे पालन करण्यासाठीच्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या विरुद्ध सोशल मिडीयावर बदनामीकारक मजकूर व्हायरल केल्याप्रकरणी भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांच्यासह पंधरा पदाधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी कदीम जालना पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्या तक्रारीत म्हटले आहे, की 17 जानेवारी 2022 रोजी सकाळी 3 वाजेच्या सुमारास महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तथा जालना जिल्हा पालकमंत्री राजेश टोपे यांचे भाग्य नगर जालना येथील निवासस्थानासमोर भाजप युवा मोर्चा व युवती मोर्चा जालना जिल्हा वतीने कलर्स स्प्रे पेटींग करून विद्यापीठ कायदा सुधारण विद्ययक (काळे विधेयक) महाराष्ट्र सरकारने मागे घ्यावे याकरीता राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. त्यावेळेस भाजप युवा मोर्चा जालना जिल्हा अध्यक्ष प्रा. सुजित जोगस, शरमिष्टा कुलकर्णी, सचिन गाढे, करण निकाळजे, विनोद दळवी, गणेश देशमुख, पंकज निकाळजे, जोशी, विकास निकाळजे, अश्लेषा कुलकर्णी, शुभम निकाळजे आदी भाजप युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते. या मोर्चेकरांना आमदार बबनराव लोणीकर यांच्यासह भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रम पाटील व राहूल लोणीकर तसेच मिना केदार यांनी सदरचे कृत्य करण्यास प्रवृत्त केले, त्यांचे नेतृत्व केले व त्यांना उद्युग्द केले. सध्या स्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने 15 फेब्रुवारी 2020 पर्यंत आपत्ती व्यवस्थापन कायदया नुसार कोविड- 19 महामारीच्या अनुषंगाने व जिल्हाधिकारी जालना यांचा आदेश जा.क्रं. 31/2022 /मशाका/जिनिक/आव्यप्र/कावि दि. 09.01.2022 रोजीच्या आदेशा नुसार सकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना जमावबंदी करण्याचा आदेश  आहे व रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत वैध कारणाशिवाय बाहेर फिरण्यास मनाई आदेश व कडक निर्बंध लागु करण्यात आलेले आहेत. शासनाच्या वरील निर्बंधाचे सर्व आरोपींनी उल्लंघन केले व माहिती व तंत्रज्ञान कायदयाचे उल्लंघन केले असुन आपत्ती व्यवस्थापन कायदयानुसार त्यांचेवर गुन्हा दाखल करून कायदेशिर कार्यवाही व्हावी, वरिल सर्व आरोपीतांनी संगनमत करून शासनाची तसेच राष्ट्रवादी पक्षाची व राजेश टोपे यांची बदनामी करण्याच्या दृष्टीने त्यांनी केलेले कृत्याचे व्हॉसअ‍ॅपवर, फेसबुकवर, इत्यादी समाज माध्यंमांवर प्रसारीत करुन बदनामी केलेली आहे. व तसेच त्यांनी निषेध मोर्चा काढण्यासाठी शासनाची कसलीही पूर्व परवानगी न घेता सदरचे कृत्य केलेले आहे. वरील सर्व आरोपी विरुध्द योग्य ती कायदेशिर कारवाई करून न्याय द्यावा व शहरात काही अनुचित प्रकार घडु नये याची काळजी घ्यावी .या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात सीआर नं 17/2022 कलम 188, 269, 270, 153 (अ) भादवि, सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा सहकलम 2, 3, 4, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005चे कलम 51 (ब) प्रमाणे भाजपा युवा मोर्चा जालना जिल्हाध्यक्ष प्रा. सुजित जोगस, मराठवाडा युवती संयोजिका शरमिष्टा कुलकर्णी, जिल्हा सरचिटणीस सचिन गाढे, जालना तालुका उपाध्यक्ष करणभाई निकाळजे, शहर चिटणीस विनोद दळवी, गणेश देशमुख, पंकज निकाळजे, रश्मीका जोशी, विकास निकाळजे, अश्‍लेषा कुलकर्णी, शुभम निकाळजे आदी भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी या अकरा आरोपीतांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे भाग्यनगर येथील निवासस्थानासमोर दि 17 जानेवारी 2022 पहाटे तीन वाजेच्या सुमारास कलर स्प्रे पेंटीग करून विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक महाराष्ट्र सरकारने मागे घ्यावे या कारणासाठी जमा होऊन महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कायदा व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले व आमदार बबनराव लोणीकर, भाजपा युवा मोर्चा प्रदेशअध्यक्ष विक्रम दादा पाटील, राहुल लोणीकर, युवती मोर्चा संयोजिका मिनाताई केदार यांनी सदरचे कृत्य करण्यास प्रवृत्त केले. शासनाच्या निर्बंधांचे आरोपीतांनी उल्लंघन केले म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना आर. बी. कांगणे हे करीत आहेत.

*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button