Jalna District

सोमवार पर्यंत शाळा, महाविद्यालय, आणि खाजगी शिकवण्यांना परवानगी दिली नाही तर…

जालना -केवळ कोरोनाची भीती दाखवून महाराष्ट्रातील शाळा महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस बंद ठेवणे चुकीचे आहे. खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे सोमवारपासून शाळा, महाविद्यालय आणि खाजगी शिकवणी घेणाऱ्या संस्थांना परवानगी द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडून छेडण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकार वर असेल असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव दानवे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन देण्यात आले. महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी हे 18 वर्षाच्या पुढील आहेत आणि त्यांनी covid-19 तिच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या आहेत . महाविद्यालयापूर्वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ही लसीकरण सुरू झाले आहे .त्यामुळे कोरोनाची भीती न दाखविता शाळा महाविद्यालय पूर्ववत सुरू करावेत अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे. निवेदन देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे शिक्षक आघाडी कोचिंग क्लासेस समितीचे जिल्हा संयोजक संजय भातलवंडे, सहसंयोजक संतोष जोशी यांच्यासह पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

*विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला शासन जबाबदार*

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाची भीती दाखवून शासनाने ऊठसूट खाजगी शिकवणी वर्ग बंद केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कधी न भरून येणारे नुकसान होत आहे. त्याच सोबत शिकवणी चालविणाऱ्या शिक्षकांवर, त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. खरेतर आशा शिकवणीच्या ठिकाणी covid-19 चे सर्व नियम पाळले जातात, आणि ते पाळून शिकवणी घेण्यास शिक्षकही तयार आहेत, मात्र शासनाने त्यांच्यावर बंदी घातल्यामुळे शिक्षकांवर उपासमारीची वेळ आले आहे. विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. या सर्व प्रकाराला शासनच जबाबदार आहे. शासनाने सोमवारपासून हे शिकवणी वर्ग सुरू करण्यास परवानगी. द्यावी अशी मागणी प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन चे मराठवाडा अध्यक्ष महेश माळी यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुरेश पोहार उपाध्यक्ष प्रा. महादेव शिंदे, सचिव प्रा. मुकुंद कुलकर्णी, प्रा. दिनेश येवले, प्रा. भोसले आदींची उपस्थिती होती.

*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button