जालनेकरांसाठी येत आहे पांढरे जांभुळ आणि पॅशनफ्रुट
जालना -शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या एकनाथ मुळे हे शिक्षक पुन्हा दोन नवीन प्रकारचे शेती उत्पादन जालनेकरांच्या सेवेत उपलब्ध करून देणार आहेत. ते म्हणजे एक “पांढरे जांभूळ” आणि दुसरे “पॅशन फ्रुट”.
यापूर्वी महाराष्ट्रातच नव्हे तर मराठवाड्यात अल्पपरिचित असलेले ड्रॅगन फ्रुट हे शेतीमधील निवडूंग प्रकारातील नवीन उत्पादन घेऊन अल्प खर्चात, अल्प पाण्यामध्ये शेतकऱ्यांना वरदान ठरणारा हे उत्पादन सुरू केलं होतं, या उत्पादनाची वाढती मागणी लक्षात घेऊन त्याचे उत्पादन वाढविण्यासाठी लागवडही वाढविली आहे. त्यासोबत आता आपल्या गावरान जांभळाला पर्याय उपलब्ध करून देत अवघ्या 10 ते 12 फूट उंचीपर्यंत वाढणाऱ्या पांढऱ्या जांभळाची लागवड केली आहे ,आणि या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये ही पांढरी जांभळे जालनेकरांना खायला मिळणार आहेत. झाडाची उंची कमी असल्यामुळे तोडण्यासाठी देखील ती सोपे आहेत. जमिनीवर बसून देखील ही जांभळे तोडता येऊ शकतात. त्यापाठोपाठ आपल्याकडे कृष्णकमळ म्हणून परिचित असलेल्या फुलांच्या वेली पासून तयार होणाऱ्या “पॅशन फ्रुट” या नवीन फळाचे देखील उत्पादन येथे घेतल्या जात आहे. आणि जून-जुलैमध्ये ते देखील जालनेकरांना खाण्यासाठी उपलब्ध होणार आहे. शेती उत्पादनात नवीन प्रकार असलेल्या या उत्पादनाविषयी माहिती घेण्यासाठी परिसरातीलच नव्हे तर परजिल्ह्यातील शेतकरी आणि व्यापारी येथे येत असल्यामुळे त्यांच्या निवासाची देखील व्यवस्था इथे करण्यात आले आहे. त्याला जोड धंदा म्हणून दुर्मिळ होत चाललेला हुरडा देखील येथे खायला मिळत आहे त्यामुळे शहरातील प्रदूषणापासून मुक्त होऊन निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी इथे सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna