सोमवारी वाजनार शाळेची घंटा! शहरी भागात ८वी ते १२वी आणि ग्रामीण भागात पहिली ते ७ वीच्या शाळेला परवानगी.खाजगी शिकवण्यांचे काय?
जालना- गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शहरी आणि ग्रामीण भागातील शाळांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अखेर परवानगी दिली आहे. शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या संमतीने जारी केलेल्या आदेशानुसार जालना जिल्ह्यातील शहरी भागात आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पहिली ते सातवी पर्यंत च्या सर्व शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार सोमवार दिनांक 24 रोजी पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजणार आहे.
दरम्यान हा आदेश जारी करत असताना शहरी भागाचे निकष हे सविस्तर न सांगितल्यामुळे नेमका शहरी भाग कोणता? आणि ग्रामीण भाग कोणता? हा संभ्रम मात्र कायम आहे. यासोबत या आदेशात शाळेबद्दल स्पष्ट उल्लेख आहे मात्र खाजगी शिकवण्या घेणाऱ्या संस्थेबद्दल कोणताही स्पष्ट निर्णय दिलेला नाही. त्यामुळे शाळा सुरू झाल्याने खाजगी शिकवणी संस्था बंद का? हा मुद्दा घेऊन हे शिकवणी घेणारे संस्थाचालक सोमवारी पुन्हा शासनाच्या दरबारात आंदोलन करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
*सर्व खाजगी शिकवणी वर्ग सुरु करणार*
खाजगी शिकवण्या संदर्भात स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे खाजगी शिकवण्या घेणाऱ्या संस्थाचालकांच्या “प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन” चे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश पोहार यांना याविषयी विचारले असता ते म्हणाले, “शासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आता आम्ही कोणाच्याही परवानगीची वाट पाहणार नाहीत किंवा कोणाला परवानगी मागणार ही नाहीत. शाळेला दिलेली परवानगी ही क्लासेसला दिलेली परवानगी ग्राह्य धरून आम्ही सोमवारपासून पाचवी ते बारावी पर्यंतचे सर्व क्लासेस सुरू करणार आहोत. जालना शहरात ५० आणि ग्रामीण भागात ५० असे सुमारे १०० खाजगी शिकवणी वर्ग सोमवार पासून सुरू केले जातील. दरम्यान हे सुरू केल्यानंतर शासनाने घालून दिलेले कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळले जातील याचीही काळजी घेऊ.”
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna