खा . इम्तियाज जलील यांचा जालन्यात निषेध
जालना – औरंगाबाद शहरात प्रस्तावित हिंदू सूर्य, वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास विरोध दर्शवून पुतळ्यासाठी चा निधी शासनाने परत घ्यावा अशी मागणी करणाऱ्या खा. इम्तियाज जलील यांचा जालन्यात महाराणा प्रताप प्रेमींनी खा जलील यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करून तीव्र निषेध केला.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात रविवारी ( ता. 23) महाराणा प्रताप प्रेमींनी एकञ येत. खा. इम्तियाज जलील यांची प्रतिमा असलेला निषेध फलक हाती घेऊन घोषणा बाजी केली.तसेच सदर बाजार पोलिस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरुद्ध तक्रार अर्ज देण्यात आला आहे.
हिंदू धर्मीयांचे दैवत असलेले हिंदू सूर्य, वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा औरंगाबाद शहरातील कॅनॉट प्लेस जवळ अश्वारूढ, पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठी सर्वसाधारण सभेत ठराव घेतला असून पुतळ्यासाठी शासनातर्फे निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.तथापि खा. इम्तियाज जलील यांनी पुतळा उभारणीस विरोध दर्शवत पालकमंत्री सुभाष देसाई यांना लिहीलेल्या पञात महाराणा प्रताप यांचा एकेरी उल्लेख केला असल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे तसेच निधी परत मागविण्याची मागणी केली. संवैधानिक पदावर असलेल्या खा. जलील यांनी धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा.असे लेखी तक्रारीत नमूद करण्यात आले.
निवेदनावर शेखर बुंदेले, लखन सिंह ठाकूर ,नागेश बेनिवाल, आशिष चौहान, किरण देशमुख ,गणेश ठाकूर, विक्की राजपूत, नितीन परदेशी, डोंगर सिंग साबळे, शुभम ठाकूर , राजेश राजपूत, आनंद झारकंडे, लखन ठाकूर, सुजित बुंदेले, अंकुश सोनवणे, आशिष राठोड, अक्षय घोडके ,राजेश घुगे, रोशन ठाकूर ,सौरभ भिसे, पंकज अंधारे, मनोज पिछाडे, अर्जुन गायकवाड, निलेश पारे, आकाश माधव वाले ,निखिल माधव वाले , राहुल चौधरी, पवन परदेशी ,सचिन माधववाले, विक्की अंधारे, अमोल ठाकूर, अर्जुन जऱ्हाड, अमित कुलकर्णी, शुभम पाटील यांच्या स्वाक्षर्या आहेत.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna