स्व. ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेची बदनापूर मतदार संघात मोर्चेबांधणी
जालना- तत्कालीन शिवसेनेचे स्व. आमदार नारायणराव चव्हाण यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून बदनापूर मतदारसंघाची ओळख निर्माण केली. त्यानंतर युती तुटल्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने स्वतंत्र जागा लढविल्या. यामध्ये बदनापूर विधानसभा मतदार संघात औरंगाबाद हुन जालन्यात खासदार रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वामुळे नारायण कुचे हे भाजपाच्या वतीने आमदार म्हणून निवडून आले. त्यांची आता ही दुसरी वेळ आहे. विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर भाजप आणि सेनेची युती तुटली. आणि त्यावेळेस पासूनच बदनापूर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना आपला हक्क पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न शिवसेना करीत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर यांच्या पुढाकाराने बदनापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये अनेक ठिकाणी शिवसेनेच्या शाखा स्थापन केल्या आहेत. तोंडावर आलेल्या पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला या शाखा स्थापनेचा फायदा होऊ शकतो , शाखा स्थापन करत असतानाच जे- जे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, परंतु आता वृद्धापकाळाकडे जात आहेत अशा निष्ठावान शिवसैनिकांचा ही सत्कार करण्यात आला. तसेच शहरातील शांतिनिकेतन विद्या मंदिरात गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे ही वाटप करण्यात आले.
दरम्यान जिल्ह्यामध्ये आज सुमारे 60 शिवसेनेच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये सुमारे 25 शाखा या बदनापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये आहेत .या शाखा उद्घाटनासाठी शिवसेनेच्या प्रवक्त्या आ. डॉ. मनीषा कायंदे ,महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष तथा जालन्याच्या महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख ज्योती ठाकरे, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, यांच्यासह युवा सेनेचे विस्तारक अभिमन्यू खोतकर, शिवसेनेचे बदनापूर तालुका प्रमुख जयप्रकाश चव्हाण, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सविता किवंडे, बाला परदेशी, रावसाहेब राऊत, रविकांत जगधने, भगवान कदम, कैलास पुंगळे, आदींची यावेळी उपस्थिती होती. याच दिनाचे औचित्य साधून डॉ. मनीषा कायंदे यांच्या विकास निधीमधून बदनापूर पंचायत समितीला दिलेला 20 लाख रुपयांच्या खरेदी करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आज उद्घाटन झालेल्या शिवसेनेच्या शाखांमध्ये जालना तालुक्यातील साळेळेगाव, सिंधी काळेगाव, बदनापूर तालुक्यातील खादगाव, दावलवाडी, मात्रेवाडी, देवगाव तांडा, सोमठाणा, मालेवाडी, दाभाडी, चिखली, राजुर, तुपेवाडी, बावणे पांगरी ,आदी ठिकाणांचा समावेश आहे.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna