वडिलांच्या नावाचा पुरस्काराचा मुख्यमंत्र्यांनाच विसर, राष्ट्रवादीच्या आरोग्य मंत्र्यांकडे नाही या पुरस्कारासाठी पैसा
जालना- महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वडील आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने *वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार* 2019 च्या डिसेंबर मध्ये जाहीर केले. यामध्ये डॉक्टर, स्त्री व पुरुष आरोग्य कर्मचारी यांच्यासोबतच आरोग्यपर लेखन करणारे पत्रकार यांना देखील पुरस्कार दिला जाणार होता. प्रत्येकी एक लाख रुपये व सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप होतं.
2019 साली त्यासाठी या पुरस्कारासाठी राज्यभरातून प्रस्ताव देखील मागविण्यात आले होते. डॉक्टर, नर्सेस यांना राज्य व विविध पातळीवर पुरस्कार दिले जातात. परंतु पुरुष आरोग्य कर्मचाऱ्यांना दिला जाणारा हा पहिलाच राज्यस्तरीय पुरस्कार होता. त्यामुळे त्यांच्यामध्ये याबाबत विशेष आनंद होता. जमा झालेले प्रस्ताव हे गेल्या तीन वर्षांपासून पुणे येथील संचालक कार्यालयात पडून आहेत.
*सन 2019 मध्ये जाहीर झालेले हे पुरस्कार सन 2020 च्या आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वाटप करण्यात येणार होते. परंतु 2020 ची जयंती गेली, 2021 ची देखील गेली आणि आता 2022 ची जयंती देखील गेली.*
मग आता नेमकं शासनाला विशेष करून मुख्यमंत्र्यांनाच आपल्या सरकारमध्ये आपल्याच वडिलांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांचा विसर पडला असेल तर इतर पुरस्कारांचे काय?प्रत्यक्षात सद्य परिस्थिती मध्ये शासनाकडे एकाच विभागासाठी अमाप आणि कुठल्याही जमा खर्च गरज नसलेला पैसा खर्च होत आहे आणि तो म्हणजे, आरोग्य विभाग. आपल्या जीवाची बाजी लावून आरोग्य क्षेत्रात काम करणारे “आरोग्य मित्र”, घरादाराची पर्वा न करता ठीक ठिकाणी जाऊन माहिती गोळा करून सामान्यांना कोरोना पासून दूर ठेवण्यासाठी आपली लेखणी झिजवणारे पत्रकार, covid-19 च्या आजारात रक्ताचे नातेवाईकही पळून गेले, अशा परिस्थितीत त्यांची शुश्रुषा करणारे परिचारक, अशा सर्वांसाठीचा हा पुरस्कार आहे, मात्र या पुरस्कारासाठी शासनाकडे पैसा नाही, राष्ट्रवादी आणि शिवसेना असा यामध्ये फरक केला जात आहे? याही प्रश्नच्या चर्चेला आता सुरुवात झाली आहे. कारण आरोग्य विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे आहे, तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वडील आहेत .त्यामुळे देखील कदाचित पक्षांतरामुळे देखील हा पुरस्कार लांबणीवर पडला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान यासंदर्भात मागील दोन वर्षापासून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा केला जात आहे. मात्र कधी कोरोना तर कधी आर्थिक तरतूद,तर कधी अधिकाऱ्यांची दप्तर दिरंगाई, वेळेअभावी काही न काही कारण सांगून ते लांबनिवर जात आहेत. काल मुख्यमंत्री यांचे वडील वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती होती त्यानिमित्ताने तरी या पुरस्काराचे वितरण होईल अशी अपेक्षा होती, मात्र ती पूर्ण झालीच नाही. यासंदर्भात शिवसेनेच्या प्रवक्त्या तथा विधान परिषद सदस्य डॉ. मनीषा कायंदे यांनी आता या प्रश्नाला हात घालण्याचे ठरवले आहे ,आणि पुन्हा एकदा निधी मागण्यासाठी हा चेंडू राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तंबू गेला आहे. त्यामुळे आता पुन्हा काही दिवस का होईना या आरोग्य मित्रांना पुरस्कार निकालाची वाट पाहावी लागणार आहे.
*आई खाऊ देईना बाप भीक मागू देईना*
पुरस्काराचे प्रस्ताव तर मागितले होते आणि संबंधितांनि ते पाठवले देखील ,मात्र पुढे काय झाले हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे? कारण या पुरस्काराचे निकालच लागले नाहीत. त्यामुळे दुसऱ्या कोणाचा नंबर आला का? हे कळायला देखील मार्ग नाही. क्रमांक आला असेल तर पुरस्कार का देणार ते ही कळेना! आणि सरकारी कर्मचारी असल्यामुळे शासनाच्या विरोधातही बोलता येईना, अशी गत या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवणाऱ्या आरोग्य मित्रांची झाली आहे.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna.