“आझादी की राह पर” विविध उपक्रमातून होणार स्वातंत्र्याची जाणीव
जालना-देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली. सुरू आहे आझादीचा अमृतमहोत्सव! स्वतंत्र भारत देशात जन्मलेल्या आजच्या पिढीला वेगवेगळे स्वातंत्र्य खुणावत आहे…. निर्णय, विचार, शिक्षण, निसर्गाचं स्वातंत्र्य…!!
श्रमाचा अधिकार, स्वयंपूर्णता, समानता, सहवेदना अशा आहेत त्यांच्या अपेक्षा…!!!भेटुयात या नव्या पिढीला. ऐकू, पाहू, जाणून घेऊ काय वाटतंय त्यांना … आझादी की राह पर!
जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय , आयोजित करीत आहे महाविद्यालयीन युवा वर्गासाठी निबंध, वक्तृत्व, शॅार्ट फील्म, पोस्टर, समूह गान, पथ नाट्य स्पर्धा तर कुमारवयीन शालेय विद्यार्थ्यांसाठी समाजभान चाचणी, वर्षभर इतरही अनेक उपक्रम,‘आझादी की राहपर ‘ या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम घेण्यासाठी राज्यव्यापी अभियान समिती कार्यरत आहे आणि त्याच्या अंतर्गत असलेल्याजालना जिल्हा संयोजन समिती जाहीर करण्यात आली आहे. ती पुढील प्रमाणे.जिल्हा समन्वयकपदी डाॅ.सुहास सदाव्रते , डाॅ.यशवंत सोनुने,सामाजिक कार्यकर्ते बी.एस.सय्यद,गणेश जोशी यांच्यासह कार्यकारिणी निवड करण्यात आली आहे,अशी माहिती राज्य संयोजक युवराज गटकळ यांनी दिली आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त युवकांसाठी देशव्यापी अभियानास सुरुवात झाली आहे. देशात ता.१२ जानेवारीपासून अभियान प्रारंभ झाला असून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीदिन ( १४ एप्रिल) पर्यंत विविध उपक्रमाचे आयोजन ऑनलाइन ,ऑफलाइन करण्यात आले आहेत.युवकांसाठी निबंध, वक्तृत्व, पथनाट्य, लघुपट, समूहगायन,पोस्टर स्पर्धा, व्याख्यान, चर्चासत्र, परिसंवाद,नाट्य,चित्र प्रदर्शन असे विविध कार्यक्रमातून जागर मांडण्यात येणार आहे. नर्मदा बचाव आंदोलन प्रणेत्या मेधा पाटकर,गांधीवादी डाॅ.सुगन बरंठ,राज्य संयोजक युवराज गटकळ यांनी जालना जिल्हा समिती पदाधिकारी निवड केली आहे. उर्वरित कार्यकारणी मध्ये डाॅ.कैलास इंगळे, जमीर शेख, सहसंयोजक आर.आर.जोशी,संतोष लिंगायत, डाॅ.दिगंबर दाते,कैलास भाले,रामदास कुलकर्णी, प्रा.वैभव अंबरवाडीकर यांची निवड करण्यात आली. तालुका संयोजक पुढीलप्रमाणे जालना – संदीप इंगोले, बदनापूर- राजेभाऊ मगर,भोकरदन- संजय शास्त्री,जाफराबाद- दिनकर ससाणे,मंठा – प्रा.प्रदीप देशमुख, परतूर – सुनील खरात,अंबड – डाॅ.विद्या दिवटे,घनसावंगी – अशोक डोरले यांची निवड करण्यात आली. विद्यालय विभाग प्रमुखपदी पवन कुलकर्णी,महाविद्यालय प्रमुखपदी डाॅ.ज्योती धर्माधिकारी तर प्रसिद्धी विभाग प्रमुख डाॅ.एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna