Jalna District

दोन ऊस तोड कामगारामध्ये हाणामारी; एकजण ठार

जालना- साखर कारखान्यात उसाची बैलगाडी रिकामी करण्याच्या कारणावरून दोघांमध्ये झालेल्या मारहाणीत एकजण जागीच ठार झाल्याची घटना आज पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली .

घनसावंगी तालुक्यातील मुरमा येथील ऊसतोड कामगार गुलाब केरभान सोनवणे हे आज ता. 26 पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास तोडलेला ऊस  बैलगाडीत भरून तिर्थपुरीच्या सागर साखर कारखान्यात घेऊन गेले होते.
बैलगाडीतील ऊस गव्हाणीजवळ क्रेनखाली  उतरवीत असताना दीपक लक्ष्मण गायकवाड (रा. खालापुरी) याने आपली ऊसाची गाडी आडवी लावली .
सोनवणे यांनी ही  बैलगाडी बाजूला काढण्यास सांगितल्यावरून  सोनवणे आणि दीपक गायकवाड यांच्यात वाद झाला.
या वादानंतर दीपक गायकवाड  याने  गुलाब सोनवणे यांच्या बैलगाडीत उडी मारून, गुलाब यांच्या गुप्तांगावर लाथा मारल्या.
यामारहाणीत गंभीर जखमी होऊन गुलाब सोनवणे हे जागीच मरण पावले.
याप्रकरणी गोंदी पोलिसांनी मयत गुलाब सोनवणे यांचा मुलगा नवनाथ सोनवणे यांचा फिर्यादीवरून आरोपी दीपक गायकवाड याच्याविरुद्ध भादंवि. 302 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ हे पुढील तपास करीत आहेत.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna
       

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button