डॉ. विजय राठोड यांचे जिल्हाधिकारी म्हणून पहिले ध्वजारोहन जालन्यात.
जालना-जालन्यात बदलून आलेले डॉ. विजय राठोड यांनी जिल्हाधिकारी म्हणून जालन्यात पहिल्यांदाच पदभार स्वीकारला आहे. आणि तो स्वीकारल्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम देखील त्यांच्या हस्ते पहिल्यांदाच पार पडला.
रंगीत फेटा बांधून आलेले जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी ध्वजारोहणानंतर सर्व विभागप्रमुख अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर ,आदींची उपस्थिती होती. या कोरोनाच्या काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शहरातील कांही हॉस्पिटल चा प्रमाणपत्र देऊन सन्मानही करण्यात आला.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. अविनाश मरकड यांचाही यामध्ये समावेश होता. हॉस्पिटलच्या यादीमध्ये संजीवनी हॉस्पिटल च्या वतीने डॉ.शिवदास मिरकड, गणपती नेत्रालया च्या वतीने शैलेश जोशी, दीपक हॉस्पिटलच्या वतीने डॉ. गुरुराज थत्तेकर यांनी हा सन्मान स्वीकारला.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna