श्री सरस्वती भुवन प्रशालेची नवीन प्रेरणादायी प्रार्थना
जालना- “ग्यान का उपवन है हमारा” ही नवीन प्रार्थना श्री सरस्वती भुवन प्रशाला जालना, यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रकाशित करण्यात आली आहे. शाळेचे गतवैभव, हे वैभव मिळविण्यासाठी मान्यवरांनी घेतलेली मेहनत, सद्यपरिस्थिती आणि येणाऱ्या पिढीमध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेमाची ज्योत तेवत ठेवण्यासाठी ही प्रार्थना समन्वय घडवेल असा विश्वास या प्रार्थनेच्या आयोजकांनी व्यक्त केला आहे.
श्री सरस्वती भुवन प्रशाला जालना येथे ७३वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून प्रशालेच्या प्रार्थना गीताचे विमोचन संपन्न झाले.
या वेळी व्यासपीठावर श्री स. भु. जालना संस्थेचे अध्यक्ष सुनील रायठठ्ठा, मुख्याध्यापक पी. जी. बोराडे, प्रार्थना गीताचे लेखक आणि शाळेचे माजी विद्यार्थी विनोद जैतमहाल, श्रीमती अंजली बडवे, संगीत शिक्षक व गीताचे संगीतकार, गायक दिनेश संन्यासी आदी मान्यवर उपस्थित होते. गीताचे संगीत संयोजन विशाल कांबळे यांचे आहे.
या प्रसंगी गीतकार विनोद जैतमहाल यांनी शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देत गीतलेखनामागची भूमिका मांडली. संगीतकार दिनेश संन्यासी यांनी हे गीत आकार घेत असतानाचे अनुभव सांगितले. तर सुनीलभाई रायठठ्ठा यांनी शाळेच्या पुढील वाटचालीबद्दल मार्गदर्शन करून अध्यक्षीय समारोप केला.या गीताच्या गायिका आणि शाळेच्या माजी विद्यार्थिनीअंजली काजलकर, आश्लेषा कुलकर्णी, श्रावणी हिवरेकर, श्रवणी कुलकर्णी यांचाही सत्कार या वेळी अध्यक्षांनी केला.कार्यक्रमास शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.सूत्रसंचालन शिक्षक श्रीआमले यांनी केले तर आभार श्री नंद यांनी मानले.
प्रार्थना गीत
ज्ञान का उपवन हमारा ,श्री सरस्वती भुवन है
विभूतियों की मेहनत का फल ,गंगा जैसे पावन है।
गुरुजनों की वाणी प्रफुल्लित ,करे प्रकाशित चारो दिशाएं
शब्दों में है उनके अमृत ,जागे प्रगती की आशाएं।
देश के आगे स्वार्थ को त्यागे ,समाजहित में जीवन है।
विभूतियों की मेहनत का फल गंगा जैसे पावन है।।
अनेक नदियां एक सिंधू है, हम भारत के लोग बंधू है
मिसाल हम है एकता की,न्याय समता स्वतंत्रता की
हमें न रोके कोई बाधा, विश्व हमारा आँगन है
विभूतियों की मेहनत का फल ,गंगा जैसे पावन है।।
ज्ञान का उपवन हमारा,सरस्वती का भुवन है ये
विभूतियों की मेहनत का फल,गंगा जैसे पावन है।
***************
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna