Jalna District

चांगल्या समाजनिर्मितीसाठी स्वतःच्या कामातून वेळ द्या! डॉ. हितेश रायठठ्ठा

जालना-कोणतेही चांगले काम सुरू करण्यासाठी अनेक संकटे येतात, नैराश्य येते, मात्र या संकटांवर मात करून आपण जर पुढे चालत राहिलो तर आपोआपच समाज आपल्या सोबत येतो आणि एक चांगले काम सुरू होते. त्यामुळे प्रत्येकाने चांगला समाज, चांगला देश घडवण्यासाठी आपल्या दैनंदिन कामामधून थोडा तरी वेळ समाजासाठी दिला पाहिजे, जेणे करून एक चांगला सुसज्ज, स्वच्छ समाज निर्माण होईल. असे मत डॉ. हितेश रायठठ्ठा यांनी व्यक्त केले. यूथ ग्रीन आर्मी, सृष्टी फाउंडेशन व मैत्र मांदियाळी यांच्या संयुक्त विद्यमाने 26 जानेवारी पासून प्लास्टिक कचरा संकलन मोहीम सुरू करण्यात आली आहे. या संकलन मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी डॉ. रायठठ्ठा बोलत होते.

शहरातील गांधीचमन आणि शिवाजी पुतळा या दोन ठिकाणांहून प्लास्टिक कचरा संकलन मोहिमेला सुरुवात झाली. गांधीचमन येथे झालेल्या या उद्घाटन प्रसंगी नगरसेविका सौ. संध्या देठे, डॉ. अनुराधा राख, यांच्यासह ग्रीन आर्मी फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ. संध्या जहागिरदार ,सचिव संजीवनी देशपांडे, उपाध्यक्ष विद्या पाटील, मार्गदर्शक डॉ. सौ प्रतिभा श्रीपत यांच्यासह सदस्य मंजुषा क्षीरसागर, शारदा व्यवहारे, सौ. जयश्री कुंजके, सौ. संगीता मुळे, सौ. राजश्री मुरगे, सौ. शैला पोपळघट, सौ. सुजाता देवरे आदी महिला पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. नगरपालिकेच्या घंटागाडी मध्ये प्लास्टिकचा कचरा दिल्यानंतर नागरिकांना त्याबदल्यात एक कापडाची पिशवी देण्यात आली. घरातील टाकाऊ प्लास्टिकचा कचरा आणखी एकत्र जमा करून त्याचा पुनर्वापर करण्यात येणार असल्याची माहिती सौ. प्रतिभा श्रीपत यांनी दिली.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

Related Articles