राज्य

दीपक डोंगरेचा तडीपारीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; आमदार कुचे यांनी या प्रकरणात गोवले असल्याचा डोंगरे यांचा आरोप

जालना -बदनापूर विधानसभेचे भाजपाचे आमदार नारायण कुचे यांचा भाचा दीपक डोंगरे याच्यावर मागील वर्षी तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान याप्रकरणी दीपक डोंगरे यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेऊन ही कारवाई रद्द करून आणली. 13 महिने 13 दिवस जालना जिल्ह्यातून तडीपार झालेल्या दीपक डोंगरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

भारतीय जनता पक्षाचे बदनापूर विधानसभेचे आमदार नारायण कुचे यांनी कसा छळ केला त्या बद्दल “आप बीती “जाहीर केली .दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना दीपक डोंगरे याच्यावर विविध पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्या प्रकरणी त्याने सविस्तर खुलासा केला. आमदार नारायण कुचे यांनी राजकीय दबाव तंत्राचा वापर करून विविध पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल करायला लावले. त्यासोबत घरगुती वादाच्या कारणावरून महिलांना पुढे करून आपल्याला गोवण्याचा प्रयत्न केला, मात्र ज्या महिलांनी आपल्यावर आरोप केले होते त्यांनीच नंतर पोलीस ठाण्यामध्ये आमदार कुचे यांचे नाव घेऊन तसे करण्यास भाग पाडण्याची लिहून दिल्याचेही ते म्हणाले. व्यवसायानेदीपक डोंगरे वरील तडीपार ची कारवाई सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; आ. कुचे यांनी प्रकरणात गोवल्याचा दीपक डोंगरे चा आरोप .
जालना -बदनापूर विधानसभेचे भाजपाचे आमदार नारायण कुचे यांचा भाचा दीपक डोंगरे याच्यावर मागील वर्षी तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान याप्रकरणी दीपक डोंगरे यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेऊन ही कारवाई रद्द करून आणली. 13 महिने 13 दिवस जालना जिल्ह्यातून तडीपार झालेल्या दीपक डोंगरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. भारतीय जनता पक्षाचे बदनापूर विधानसभेचे आमदार नारायण कुचे यांनी कसा छळ केला त्या बद्दल “आप बीती “जाहीर केली .दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना दीपक डोंगरे याच्यावर विविध पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्या प्रकरणी त्याने सविस्तर खुलासा केला. आमदार नारायण कुचे यांनी राजकीय दबाव तंत्राचा वापर करून विविध पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल करायला लावले. त्यासोबत घरगुती वादाच्या कारणावरून महिलांना पुढे करून आपल्याला गोवण्याचा प्रयत्न केला, मात्र ज्या महिलांनी आपल्यावर आरोप केले होते त्यांनीच नंतर पोलीस ठाण्यामध्ये आमदार कुचे यांचे नाव घेऊन तसे करण्यास भाग पाडण्याची लिहून दिल्याचेही ते म्हणाले. व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर असलेल्या दीपक डोंगरे यांच्याकडे शासकीय गुत्तेदार असल्याचे प्रमाणपत्र आहे. त्या माध्यमातून काम करत असताना नारायण कुचे यांनी त्यांचे देयके देखील राजकीय दबाव आणून अडवून ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला. याच सोबतच इतरही आरोप त्यांनी केले आहेत. या पत्रकार परिषदेला 13 महिने 13 दिवस ते ज्यांच्याकडे राहिले ते वाळूज येथील त्यांचे भावजी संजय कच्चे यांचीही उपस्थिती होती. 

*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

Related Articles