Jalna District

या 11 सदस्यांना जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदाची लॉटरी

जालना- जिल्ह्याच्या विकासासाठी अंदाजपत्रक तयार करून धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी जिल्हा नियोजन आणि विकास समिती (dpdc)कार्यरत असते. पालकमंत्र्यांच्या अधिपत्याखाली शासनाच्या कोट्यावधी रुपयांचा निधी नियोजन समितीमध्ये ठराव घेऊन खर्च करावा लागतो. त्यानुसार नियोजन समितीच्या वारंवार बैठका होत असतात. अशा या जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची असलेल्या जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित आणि अनुभवी व्यक्तींची निवड केल्या जाते. त्यानुसार जालना जिल्हा नियोजन समितीवर दोन विशेष निमंत्रितांची तर 9 नियोजन समितीचा अनुभव असलेल्यांची 9 सदस्यांचॆ निवड करण्यात आली आहे.

राज्याचे उपसचिव सं. हं. धुरी यांनी काल हे आदेश जारी केले. नियोजन समितीवर विशेष निमंत्रित म्हणून एक विधिमंडळ सदस्य आणि एक खासदार यांचीही नियुक्ती केली जाते. त्यानुसार विशेष निमंत्रितामध्ये परभणीचे खासदार संजय जाधव तर विधान मंडळाचे सदस्य राजेश राठोड यांची निवड केली आहे. उर्वरित नियुक्त्यांमध्ये जिल्हा नियोजन समितीचा अनुभव असलेल्या, सामान्यपणे जिल्हा नियोजन समितीच्या क्षेत्रातील निवासी असलेल्या नऊ व्यक्तींचा समावेश असतो. या पदाची लॉटरी लागलेले 9 व्यक्ती पुढील प्रमाणे.
१)माजी आमदार चंद्रकांत दानवे ,भोकरदन
२)रवींद्र तौर, लिंबी, तालुका घनसावंगी.
३) जयंत वाकुळणीकर, वाकुळणी, तालुका बदनापुर.
४) बळीराम कडपे, आष्टी तालुका, परतुर.
५) जयाजी किसनराव देशमुख ,नसडगाव, तालुका जालना,
६) राजेभाऊ देशमुख, भोकरदन.
७) माजी आ. अरविंदराव चव्हाण, जालना.
तसेच शिवसेनेचे दोन्ही जिल्हाप्रमुख
८)भास्कर आंबेकर ,जालना
९) आसाराम बोराडे यांचाही यामध्ये समावेश आहे.

*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button