लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक दोन दिवसांपासून गायब
जालना -येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे हे बुधवारी (ता.2) रात्री सात वाजेच्या सुमारास शहरातील यशवंतनगर भागातील राहत्या घरून अचानक गायब झाले आहेत. मित्राला भेटण्यासाठी जात असल्याचे पत्नीस सांगून ते घराबाहेर पडले होते.घराबाहेर जाताना त्यांनी कोणतेही वाहन, मोबाईल फोन आणि खिशातील वॉच पाकीटही सोबत नेलेले नाही.
याबाबत माहिती मिळताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे औरंगाबादचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे हे गुरुवारी दिवसभर जालना शहरात ठाण मांडून होते ,अशी माहिती पुढे येेेत आहे.
एसीबीच्या कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली आहे व बऱ्याच ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले आहेत.
यासंदर्भात कदीम जालना पोलीस ठाण्यात श्री ताटे हेे हरवल्याची तक्रार गुरुवारी रात्री उशिरा त्यांच्या पत्नीने दिली आहे.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna