Jalna District

गायब पोलीस निरीक्षकांचा समांतर यंत्रणेमार्फत तपास सुरू

जालना-  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संग्राम ताठे हे चार दिवसापूर्वी गायब झाले आहेत. आपल्या राहत्या घरातून ती कोणालाही काही न सांगता बाहेर पडले आणि गायब झाले. त्यांनी सोबत मोबाईल किंवा इतर कोणत्याही वस्तू न नेल्यामुळे त्यांचा तपास करणे हे पोलिस प्रशासनासमोर एक आव्हान आहे.

 

त्यासंदर्भात कदीम जालना पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार नाही देण्यात आली आहे. त्यानुसार कदीम जालना पोलीस, पोलीस निरीक्षक श्री. ताठे यांचा तपास घेत आहे त्यासोबत. श्री ताठे हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत होते. त्यामुळे या विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील जालन्यात येऊन माहिती घेऊन गेले आहेत, आणि त्यांची यंत्रणा देखील तपास करत आहे. यासंदर्भात जालन्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांनीदेखील कदीम जालना पोलिस , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्यासह अन्य काही समांतर यंत्रणा गायब असलेल्या पोलीस निरीक्षकचा तपास करण्यासाठी कार्यरत असल्याचे सांगितले. तसेच संग्राम ताठे यांच्या नातेवाईकाकडे, मित्राकडे, तसेच त्यांच्यासोबत काम करणाऱ्या इतर सहकाऱ्यांकडून माहिती घेऊन त्याचे तांत्रिक विश्लेषण करून त्या दिशेने तपास सुरू असल्याचेही ते म्हणाले.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button