जिल्हास्तरीय रुग्णालयातून नवजात अर्भक पळविले
जालना शहरातील महिला व बाल रुग्णालयातून चक्क बाळाची चोरी झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. आज सकाळी या बाळाची नातेवाईक असलेली महिला बाळाला उन्हात घेऊन बसली होती, यावेळी या महिलेचा विश्वास संपादन करून एका महिलेने या बाळाला पळविले असल्याचे सांगण्यात येत
आहे.जालना तालुक्यातील पारेगाव येथील रुकसाना अहमद शेख या महिलेला प्रसूतीसाठी काल जिल्हा व महिला बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेने रात्रीच मुलाला जन्म दिला. त्यानंतर आज सकाळी या महिलेेला सामान्य कक्षामध्ये स्थलांतरित करण्यात आले होतं . याच वेळी या रुग्णाच्या एका महिला नातेवाईकाने बाळाला कोवळ्या उन्हात ठेवण्यासाठी नेले आणि याच वेळी तिथे असलेल्या एका महिलेने त्या महिलेचा विश्वास संपादन करून या महिलेची नजर चुकवून त्या महिलेनं बाळाला घेऊन पोबारा केला. ही घटना सर्वांच्या लक्षात येताच जिल्हा महिला व बाल रूग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna