तहसीलदारांच्या विरोधात तलाठ्यांनी थोपटले दंड; ९ तारखेपासून तलाठी सामूहिक रजेवर
जालना -जालना तहसीलचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या मनमानी कारभाराला आणि हुकूमशाहीला वैतागून तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. जोपर्यंत जालन्याच्या तहसीलदारांची बदली होत नाही तोपर्यंत दिनांक ९ पासून सामूहिक रजेवर जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
आज दिनांक 7 रोजी शासकीय कार्यालयांना सुट्टी असताना देखील तलाठी, मंडळ अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी संदिपान सानप यांची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये श्री. सानप यांनी तलाठी मंडळ अधिकारी यांचे वैयक्तिक म्हणणेही ऐकून घेतले. दरम्यान महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या जालना तालुका शाखेच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे, की जालन्या चे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्याकडून योग्य वागणुकीची अपेक्षा असताना ती मिळत नाही. तलाठी व मंडळ अधिकारी यांचे हेतुपुरस्सर चुकीचे प्रस्ताव वरिष्ठांना पाठवणे, दबावतंत्राचा वापर करणे, कारवाईची धमकी देणे, एवढेच नव्हे तर तुमचे नुकसान करून पेन्शन मिळू देणार नाही, महिला कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत बोलणे ,अशा पद्धतीची वागणूक मिळत आहे. त्यामुळे तलाठी व मंडळ अधिकारी यांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. यासोबत तहसीलदारांनी मंडळ अधिकारी ए.बी. पुरी यांची दलालामार्फत तक्रार घेऊन हेतूपुरस्सर विभागीय चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांकडे पाठविले आहे. त्यांच्या शिस्तभंगाच्या कारवाई चा प्रस्ताव पाठवून त्यांना मानसिक आर्थिक व नोकरी संपविण्याची भाषा केली जात आहे. त्यासोबत पी. आर. जाधव, एस. आर, जाधव, आय.बी. सरोदे, व व्ही. बी. कणके यांचे महसूल व इतर कामे चांगली असतानाही त्यांची जाणीवपूर्वक वेतनवाढ रोखण्याचा प्रस्ताव त्यांनी वरिष्ठांकडून करून घेतला आहे. त्यासोबत सिरसवाडी सज्जाचे तलाठी श्री. सरोदे यांच्यासोबत मोबाईल वरून देखील असभ्य भाषेत संभाषण केले आहे. तहसीलदारांच्या त्रासाला कंटाळून तलाठी व मंडळ अधिकारी यांचे बरेवाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी तहसीलदार यांच्यावर असेल, असेही उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने म्हटले आहे. त्यासोबत जालन्याच्या तहसीलदारांची जोपर्यंत बदली होत नाही तोपर्यंत तलाठी आणि मंडळ अधिकारी सामूहिक रजेवर जात असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या जालना तालुका शाखेचे अध्यक्ष बाळकृष्ण कळकुंबे, सचिव एन. के. कुलकर्णी, यांच्यासह आय.बी. सरोदे, एस. पी. राठोड, बी. ए. मोरे, एन. एस. शिरभाते, बी. जी. गिरी, बी. आर .वाघ ,यांच्यासह मंडल अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
* 48 जण जाणार रजेवर* जालना तालुक्यात सुमारे 40 तलाठी आणि आठ मंडलाधिकारी असे एकूण 48 कर्मचारी महसूल विभागात कार्यरत आहेत. बदली नाही झाली तर नऊ तारखेपासून हे सर्वजण सामूहिक रजा देणार आहे.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna