Jalna District

ऊस तोडी साठी मध्यस्थी करणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाचे अपहरण

जालना- ऊस तोडी साठी कोयते (मजूर)मिळवून देण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या परतूर तालुक्यातील रायगव्हाण येथील नामदेव खंडुजी कडपे,वय 60 यांच्या मुलाचे चार गुत्तेदारांनी अपहरण केल्याची घटना 31 जानेवारी रोजी घडली.

दरम्यान या मुलाचा ठावठिकाणा माहीत असतानाही पोलीस शोध घेण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप नामदेव कडपे यांनी केला आहे, तर ज्या ठिकाणी मुलगा असल्याचा सुगावा लागला होता ते ठिकाण परराज्यात आहे आणि तेथे पोलिसांचे पथक जाऊन आले आहे. मात्र तो भेटला नाही त्यासोबत आरोपी हे माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे आहेत आणि तिथेही पथक जाऊन आले मात्र घराला कुलुप असल्याची माहिती आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नागरे यांनी दिली आहे.

रायगव्हाण येथील शेतकरी नामदेव खंडुजी कडपे यांनी आष्टी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की त्यांच्या ओळखीचे शेख मेहबूब शेख गुलाब हे त्यांना नोव्हेंबर 2021 मध्ये भेटले होते आणि ऊस तोडी साठी काही मजूर मिळतील का याची चौकशी केली होती. त्यानंतर नामदेव कडपे यांनी ऊसतोड मजुरांचा शोध घेऊन त्यांच्या ओळखीचे कीनोद मुरलीधर आडे, यांची भेट घालून दिली. त्यानंतर आडे आणि शेख मेहबूब यांच्यामध्ये ऊस तोडी चा करार झाला. या करारावर साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केली आहे. त्यानुसार चोवीस कोयते ऊसतोडीसाठी देण्याचे ठरले आणि त्या बदल्यात चोवीस लाखांचा व्यवहार झाला. परंतु प्रत्यक्षात नामदेव कडपे यांचा आर्थिक व्यवहाराशी काहीही संबंध नाही. प्रत्यक्षात विनोद आडे यांनी फक्त सातच कोयते ऊसतोडीसाठी पाठवले. त्यामुळे शेख मेहबूब शेख गुलाब यांनी पुन्हा नामदेव कडपे यांच्याकडे विचारणा सुरू केली. या व्यवहारात आपला संबंध नाही असे म्हणून नामदेव कडपे यांनी विनोद आडे यांच्याकडे संपर्क साधण्यासाठी सांगितले. त्यावर शेख मेहबूब यांचे समाधान झाले नाही त्यामुळे दिनांक 31 जानेवारीला दिंद्रुड येथे राहणारे शेख मेहबूब शेख गुलाब, शेख बाबु शेख मेहबूब, निवास सुखदेव गुजर आणि शेख जुबेर शेख अकबर हे चार जण नामदेव कडपे यांच्या ब्राह्मणवाडी शिवारात असलेल्या शेतात आले. त्यावेळी नामदेव कडपे आणि त्यांचा मुलगा केशव हे शेतात काम करत होते.त्यांना पैशाची विचारणा झाल्यानंतर थोड्यावेळासाठी हे चारही जण निघून गेले, आणि त्यानंतर काही वेळाने हे चार जण परत आले आणि उसाने भरलेले ट्रॅक्टर केशव कडपे घेऊन जात असताना त्याला ट्रॅक्टरवरून खाली उतरवून बळजबरीने,मारहाण करून चारचाकी वाहनात भरले आणि त्याचे अपहरण केले. अशी तक्रार दिनांक 31 रोजी आष्टी पोलीस ठाण्यात नामदेव कडपे यांनी दिली आहे. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला आहे मात्र अद्याप पर्यंत केशव कडपे यांचा तपास लागलेला नाही.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button