Advertisment
Jalna District

पोटचे मुल नसल्यामुळे महिलेने पळवले होते बाळाला

जालना- स्वतःच्या पोटाला मूल होत नसल्यामुळे सेलू येथील एका महिलेने जालना येथील स्त्री रुग्णालयातील नवजात अर्भकाला काल पळवले होते. स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासात या चोरीचा छडा लावला आणि सेलू येथून एका महिलेला बाळासह ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कालपासून या मागावर होते. त्यामध्ये पोलिसांनी विविध ठिकाणी सी. सी. टीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर ही महिला रेल्वेने परभणीला गेली असल्याचे कळाले. त्यानंतर परभणी गाठून तपास करत करत हे पथक सकाळी सेलू ला आले आणि साडेचार वाजता सेलू येथून या महिलेच्या राहत्या घरातून बाळाला ताब्यात घेतले. दरम्यान या महिलेला बाळ होत नसल्याची माहिती समोर आली आहे .महिलेने या बाळाचे अपहरण स्वतःसाठी केले असल्याचेही समजते.

*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button