Jalna Districtराज्य

हसत-खेळत विद्यार्थ्यांच्या गळी उतरणार “मराठवाड्याची कथा” सीईओ जिंदाल यांचा प्रयत्न

जालना- महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात प्रत्येक क्षेत्रात मराठवाडा विभागाचे मोलाचे योगदान आहे. मग ते संस्कृतिक असेल, सामाजिक असेल, स्वातंत्र्य चळवळीचे असो किंवा पुरातत्व अशा अनेक क्षेत्रांमध्ये मराठवाडा विभागाने भरीव कामगिरी करून एक नाव लौकिक मिळवलेला आहे. दिवसेंदिवस अत्याधुनिक युगाच्या काळात मराठवाड्याचा इतिहास, मराठवाड्याची ओळख ही हळूहळू पुसल्या जात आहे.

मराठवाड्याचं हे वैभव सामान्य विद्यार्थ्यांना माहीत व्हावे,त्याची पुन्हा उजळणी व्हावी, त्यापासून त्यांना पुन्हा प्रेरणा मिळावी या हेतूने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या संकल्पनेतून एक प्रेरणादायी आणि मराठवाड्याचे वैभव, मराठवाड्याचा इतिहास सांगणारं पुस्तक नुकतंच प्रकाशित झाला आहे, “मराठवाडयाची कथा” सुमारे सात हजार वर्षांपूर्वी रामायणाचा दाखला देत नांदेड जिल्ह्यातील उणकेश्वर येथील गरम पाण्याचे झरे, यापासून टप्प्याटप्प्याने मराठवाडा कसा बदलत गेला, स्वातंत्र्यासाठी कसे योगदान दिले, त्यासोबत मराठवाड्या सोबतच महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणाऱ्या जालना जिल्ह्यातील जांब समर्थ, अंबडच्या मत्योदरीदेवीचा इतिहास, औरंगाबाद जिल्ह्यात मुघल सम्राट औरंगजेब यांच्या कारकिर्दीत जगप्रसिद्ध झालेला कपड्यातील एक प्रकार “हिमरू” याचादेखील समावेश या पुस्तकात आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामची आठवण करून देणाऱ्या कथांचा देखील यामध्ये समावेश आहे. फक्त कथाच सांगून हे पुस्तक मोकळं होत नाही तर, विद्यार्थ्यांना हसत खेळत त्यांच्या गळी हा इतिहास उतरवण्याचा देखील प्रयत्न आहे. त्यामुळे या पुस्तकात विविध कार्यकृती देखील दिलेल्या आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना रमत-गमत आणि त्यांच्या आकलन शक्तीला वाव देत हा इतिहास त्यांच्या पर्यंत पोहोचेल.

*बालकांपासून शिक्षकांपर्यंत याचा उपयोग*
शालेय विद्यार्थ्यांपासून त्यांच्या शिक्षकांना देखील हे पुस्तक उपयोगी पडणार आहे. त्यामुळे कोणत्या विशिष्ट वयोगटासाठी या पुस्तकाचे लिखाण झालेले नाही ,तर सर्वसमावेशक वाचक डोळ्यासमोर ठेवून लिहिण्यात आले आहे. जालना जिल्हा परिषदेच्या अनेक शिक्षकांच्या संकल्पनेतून हे पुस्तक साकारले गेलं आहे. त्यामुळे या शिक्षकांच्या वैचारिक पातळीचा कस देखील पुस्तकात आढळून येतो. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे विद्यार्थ्यांचा मागे पडलेला अभ्यासक्रम पूर्ण करत असतानाच एक विरंगुळा म्हणून देखील या पुस्तकाचा उपयोग होणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत या पुस्तकाच्या प्रती दिल्या जाणार आहेत आणि शिक्षकांना देखील या पुस्तकातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कथा सांगण्यात आनंद मिळणार आहे. या पुस्तकाबद्दल बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल म्हणाले, की विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षकांच्या मदतीने हा प्रयत्न केला जाणार आहे. आवश्यकता पडली तर मागे पडलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आणि हसत खेळत शिक्षण देण्यासाठी वेळ प्रसंगी उन्हाळ्यात देखील जास्तीचे वर्ग घेतले जातील, हे पुस्तक साकारण्यामागे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, यांची ही संकल्पना आहे. त्यासोबत जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी एकत्र येऊन हे गुणवत्तापूर्ण पुस्तक साकारलं आहे.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button