ट्रायल देणे पडले महागात; इलेक्ट्रिक स्कूटी घेऊन ग्राहक फरार
जालना-ग्राहक म्हणून आलेल्या एका इसमाने चक्कर मारण्यासाठी नेलेली इलेक्ट्रिक स्कूटर गायब केल्याची घटना काल दुपारी जालना शहरातील एका शोरूम मध्ये घडली.
स्कूटर गायब करणारा आरोपी सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद असून पोलिस त्याचा तपास पोलीस घेत आहेत. औरंगाबाद रोडवर एन. आर. जी. ऑटो इलेक्ट्रिक इंडस्ट्री आहे. या इंडस्ट्रीमध्ये सेल्समन म्हणून , गणेश गजानन लोखंडे हे काम करतात त्यांनी काल दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास एका ग्राहकाला स्कुटी विषयी सर्व माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत इंडस्ट्रीजचे मालक रवींद्र गायकवाड आणि मेकॅनिक शुभम खूपसे हेदेखील उपस्थित होते. गाडी आवडली म्हणून संबंधित ग्राहकाने चक्कर मारण्यासाठी स्कूटी घेऊन गेला तो अद्याप पर्यंत आलाच नाही.
जीटी फोर्स कंपनीची पांढऱ्या रंगाची ही स्कुटी आहे. जिचा चासिस नंबर LKKDHGAXMA 2644आहे. याची बाजारात सुमारे 80 हजार ची किंमत आहे. याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. लाल रंगाचा हट्टाकट्टा आणि सुमारे तीस वर्ष वय असलेला इसम ही स्कूटी लबाडीने घेऊन गेल्याचा आरोप पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna