Advertisment
Jalna District

कन्हैयानगर- देऊळगावराजा रस्त्यावर दगडमातीचे ढीग, ग्रामस्थांचे ‘जाहीर निषेध ‘ आंदोलन

जालना- शहरातील कन्हैयानगर चौफुली ते देऊळगाव राजाकडे जाणारा महामार्गावर दगड- मातीचे ढीग आहेत,रस्त्यावर मोठाले खड्डेच खड्डे असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे,रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, यासाठी ग्रामस्थांनी ‘ जाहीर निषेध ‘ फलक लावून अनोखे आंदोलन आज दि.११लाकेले.

जालना देऊळगावराजा मार्गे खामगाव महामार्ग १६० किमीचा आहे. शहरातून कन्हैयानगर चौफुलीपासून तीन किलोमीटर रस्त्याचे कामच झाले नाही.दोन वर्षांपासून सदर काम बंद असून महामार्गावर दगड मातीचे ढीग पडलेले आहेत. रस्त्यावर मोठाले खड्डेच खड्डे पडले असून वाहनचालकांना वाहन चालविणे अवघड बनत आहे. रस्त्यावर खड्डे असून धूळीचे प्रमाण जास्त असल्याने दुचाकीवरून जाणाऱ्या वाहनचालकास नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्ता पूर्णपणे उखडलेला असून या रस्त्यावर सकाळीच जड वाहनांची गर्दी होते. कन्हैयानगर,जामवाडी,
पानशेंद्रा,गोंदेगाव, वंजार उम्रद, धावेडी,थार या गावांसह वाघ्रुळकडे जाणारे शेकडो शेतकरी आपला शेतमाल बाजार समितीत आणतात. शेतकरीवर्ग यामुळे त्रस्त झाला असून या महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने ग्रामस्थ चिंतेत दिसून येतात. महामार्गाची दुरावस्था झालेली असून लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे,यासाठी वाघ्रुळ जहागीर जिल्हा परिषद सर्कल मधील ग्रामस्थांनी अनोखे आंदोलन पुकारण्यात आले होते. महामार्गावरील दगडांच्या ढीगावर ‘ जाहीर निषेधाचा ‘ फलक ग्रामस्थांनी लावत आंदोलन केले.

महामार्गावरील रस्त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी,अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी डाॅ.विजय राठोड यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. निवेदनावर वाघ्रुळ जहागीर जिल्हा परिषद सर्कलमधील अनेक गावातील युवक कैलास वाढेकर,शिवाजी वाढेकर,रवी लांडगे, दिलीप वखरे,भागाजी दाभाडे,समीर बेनिवाले, सुरेश लष्कर, आकाश वाढेकर,सिध्देश्वर चाळगे, केशव शिंदे, विनोद ढगे यांच्या सह्या आहेत.

*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button