जेईएस महाविद्यालयाच्या विशाखा दवंडे ने मिळवले काठी शस्त्र गटात सुवर्ण पदक
जालना- 10 ते 12 चौरस फुटाच्या दोन छोट्या खोल्या, त्यामध्ये 11 जणांचा परिवार. अशा परिस्थिती वर मात करत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शिर्डी जि.अहमदनगर येथे नुकत्याच झालेल्या सिलांबम स्पर्धेत जेईएस महाविद्यालयाची बारावी वर्गात कला शाखेत शिकणारी विद्यार्थिनी कु. विशाखा विलास दवंडे हिने महिला काठी शस्त्र गटातसुवर्ण पदक पटकावून यश संपादन केले आहे.
*सिलांबम ही भारतीय उपखंडातील दक्षिण भारतात उगम पावणारी शस्त्राधारित भारतीय मार्शल आर्ट आहे. तमिळ संगम साहित्यात या शैलीचा उल्लेख आहे. वर्ल्ड सिलांबम असोसिएशन ही सिलांबमची अधिकृत आंतरराष्ट्रीय संस्था आहे.
या यशाबद्दल तिचे महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना छोट्या दोन खोल्यांमध्ये स्वतःच्या आणि वडिलांच्या भावाचा परिवार असा एकूण अकरा जणांच्या परिवारात ती राहते. वडिलांची मिळेल ते काम करण्याची तयारी, अशा बिकट परिस्थिती मधून विशाखा पुढे आली आहे .6 वी पासूनच तिच्या मनामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याची इच्छा होती. 24 ऑक्टोबर 2016 ला ती पहिल्यांदा जालन्यात झालेल्या पाच किलो मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झाली, आणि तिने प्रथम क्रमांक पटकावून यश मिळवले. आईकडे असलेल्या 40 रुपयांपैकी वीस रुपये घेऊन स्पर्धेत यश संपादन केले आणि बक्षीस म्हणून दीड हजार रुपये तिने घरी आणले. त्यावेळेपासून तिची खेळामधील आवड वाढली नंतर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तिने हे यश संपादन केले. त्यापैकी सर्वात मोठे यश म्हणजे शिर्डी येथे मिळालेले हे सुवर्णपदक.
यशाचे गमक सांगताना विशाखा म्हणाली” आपण मिळवलेले यश हे घरची परिस्थिती काय आहे यावर अवलंबून नसतं, तर त्यांच्या मदतीने आपण मेहनत आणि जिद्दीच्या चिकाटी वर यश संपादन करू शकतो. हे संपादन करण्यासाठी आर्थिक सुबत्ता आणि सर्व सुख सोयी पाहिजेतच असे नाही. आपण कमावलेल्या यशावर त्या उपलब्ध होऊ शकतात.” विशाखा चे वडील विलास दवंडे रोज मजुरी करतात आणि मिळेल ते काम करतात. आई मंदा एका बियाण्याच्या कंपनीत रोजंदारीवर काम करते तर तिचा भाऊ मिलिंद एका हॉटेलमध्ये रात्रपाळीत काम करून दिवसा महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. अशा या परिस्थितीतून विशाखाने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. भविष्यामध्ये पोलीस निरीक्षक होण्याच्या दिशेने ती पावले टाकत आहे. तिला शुभेच्छा देण्यासाठी ८१८०००२७३० या नंबर वर कॉल करू शकता. विशाखा तिच्या महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या वेळी, क्रीडा विभाग प्रमुख डॉ.हेमंत वर्मा, डॉ. महाजन,डॉ. एफ एम मोहिते, प्रा.शिवाजी वानरे, उपस्थित होते.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna