ट्रॅक्टर मुळे मिळाली दुचाकी शेतकऱ्याला समाधान
जालना- शहरातील टाफे मॅसी फरगुशन ट्रॅक्टर चे अधिकृत विक्रेते काकडे पाटेकर ट्रॅक्टर च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भाग्यवान ग्राहक बक्षीस योजनेमध्ये शेतकऱ्याला ट्रॅक्टर खरेदीमुळे केल्यामुळे एक दुचाकी मिळाली. नुकताच मराठी चित्रपट”फास” हा प्रदर्शित झाला आहे आणि चित्रपटात कलाकार असलेल्या उमा फुलारी यांच्या हस्ते या दुचाकीचे बक्षीस रामकिसन मिराळे यांना देण्यात आले.
टाफे ट्रॅक्टर चे अधिकृत विक्रेते काकडे पाटेकर ट्रॅक्टर च्या वतीने “मॅसी किसान बंधन” रेफरल स्कीम आयोजित करण्यात आली होती. दिनांक 1 ऑगस्ट 2021 ते 31 जानेवारी 2022 च्या दरम्यान जे शेतकरी बांधव ट्रॅक्टर खरेदी करतील त्यांच्यासाठी ही योजना होती. या योजने दरम्यान गुणानुक्रमे एक दुचाकी, एक टीव्ही, आणि एक फ्रिज अशा बक्षीस योजनेचे ही नियोजन केले होते. त्यानुसार शनिवार दिनांक 12 रोजी बक्षीस योजनेचे वितरण करण्यात आले. सर्वच ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसमोर या योजनेचा लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यामध्ये रामकिसन निराळे यांना दुचाकी, शिवाजी जोगदंड यांना फ्रिज, तर श्रीहरी हांडे यांना टीव्ही मिळाला आहे. शेतकरी बांधवांसोबतच यावेळी काकडे- पाटेकर ट्रॅक्टरचे संचालक प्रल्हादराव काकडे, विष्णू पाटेकर, टाफे कॅम्प निलेश केंडे, किशोर काकडे, के. पी. विघ्ने, बाबुराव कदम यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली सोनवलकर यांनी केले.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna