पोलीस निरीक्षक ताटे सापडले; कदीम जालना पोलिसांना यश

जालना-लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक संग्राम ताटे, हे 2 फेब्रुवारी2022 पासून रात्रीच्या वेळी अचानक गायब झाले होते. त्या संदर्भात त्यांची पत्नी नीलम संग्राम ताटे, वय 36 यांनी कदीम जालना पोलिस ठाण्यात संग्राम ताटे हरवल्याची तक्रार नोंदवली होती.
तेव्हापासून सर्वच पोलिस यंत्रणा आपापल्या परीने तपास करत होती. दरम्यान ताटे हे पोलिस यंत्रणेमध्ये काम करत असल्यामुळे त्यांनी कुठलाही पुरावा मागे सोडला नव्हता. ते अचानक गायब झाले या संदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात होते, आणि कदीम जालना पोलिस ठाण्यात श्री.ताटे हरवल्याची तक्रार दाखल झाल्यामुळे पोलीस देखील त्यांच्या तपासावर होते. कदीम जालना पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ते सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथे असल्याची माहिती कदीम जालना पोलिसांना मिळाली. त्यानुसार या पथकाने संग्राम ताटे यांना खंडाळा येथून ताब्यात घेऊन ताटे यांचा भाऊ संदीप शिवाजी ताटे, राहणार तारूखा तालुका, कराड जिल्हा सातारा. यांच्या ताब्यात दिले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून एका पोलिस निरीक्षकाचा तपास लागत नसल्यामुळे सर्वच पोलिस यंत्रणा कामाला लागली होती.
प्राप्त माहितीनुसार कदीम जालना पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महेश टाक हे काल एक दिवसाच्या सुट्टीसाठी गेले होते,आणि त्यांना माहिती मिळाल्यामुळे ते बाहेरच्या बाहेरच पोलीस निरीक्षक ताटे यांच्या शोधावर निघाले. त्यांना त्यामध्ये यश आल्याची माहिती समोर येत आहे
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna