Jalna District

“गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता” रासपाचे नवीन अभियान

जालना- जिल्हा परिषद आणि  नगरपालिकेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय समाज पक्षाने आता कंबर कसलीआहे.

पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी आज राष्ट्रवादी समाज पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते आणि मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये भविष्यात येणाऱ्या जिल्हा परिषद नगर पालिकेच्या निवडणुका  राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले, तसेच “गाव तिथे शाखा, आणि घर तिथे कार्यकर्ता” हे अभियान राबवून कार्यकर्त्यांची फळी तयार करण्याचेही काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. या कार्यकर्त्यांच्या संघटने नंतर 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत ५० आमदार आणि ५ खासदार निवडून आणण्याचा संकल्प ही केला असल्याची माहिती मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांनी दिली. राष्ट्रीय समाज पक्षाचे जालना जिल्हा प्रभारी ओमप्रकाश चितळकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. तसेच मराठवाडा संपर्क प्रमुख अशोक लांडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र भोसले, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोजने, यांचीही यावेळी उपस्थिती होती.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button