Jalna District

उंदराच्या पिंजऱ्यात पोपट! पाहिलाय कधी?

जालना- काही वर्षांपूर्वी एक लोकगीत खूप गाजलं होतं आणि ते म्हणजे” तुझी चिमणी उडाली भुर्र… माझा पोपट बिथरला” या गाण्याच्या प्रत्येय आज पोलिस अधीक्षक कार्यालयात असलेल्या बिनतारी संदेश यंत्रणेच्या विभागात आला.

त्याचं झालं असं की सकाळी नऊ वाजेच्या सुमारास बिनतारी संदेश यंत्रणेच्या कार्यालयात खिडकीतून एक पोपटालाआला आणि चक्क पोलिसांच्या डोक्यावर बसला. डोक्यावर बसल्यानंतर जो आत मध्ये टाकणार नाही तो पोलीस कसला? मग काय कदाचित मांजरी पासून याला सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी संदीप जाधव यांनी त्याला उंदराच्या पिंजऱ्यात कैद केले.उंदराचा पिंजरा आला कसा? तो याकरता असतो की बिनतारी संदेश यंत्रणेत वायरचे काम असते आणि कदाचित वायर कुरतडू नये म्हणून उंदरांना पकडण्यासाठी तो पिंजरा ठेवलेला होता. प्रसंगाचे भान राखत जाधव यांनी पोपटाला पिंजऱ्यात टाकलं. कदाचित हा पोपट पाळीव असावा, जेणेकरून तो माणसाच्या संपर्कात आल्या नंतरही त्याच्यावर काहीच परिणाम झालेला दिसला नाही. उलट पिंजऱ्यात कोंडलेल्या या पोपटाला घेऊन परिसरात फेरफटका मारत मारतांना इतरांनी मात्र या आगळ्यावेगळ्या प्रकाराचं कौतुकच केलं. कदाचित हा पोपट कोणाच्या तरी पिंजऱ्यातून उडून आला असल्यामुळे या उंदराच्या पिंजऱ्यात बसल्यावर देखील त्याने पपईवर ताव मारला. सकाळी झालेल्या या प्रकाराची पोलीस अधीक्षक कार्यालयात दिवसभर चर्चा चालू होती. संदीप जाधव यांनी हा पोपट परिसराच्या बाहेर नेऊन सोडून दिला.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button