मंठा पोलिसांनी केली एक लाखांची गारगोटी जप्त
जालना- शेतकऱ्याने गौण खनिजाचा विनापरवाना साठा केल्याप्रकरणी मंठा पोलिसांनी छापा मारून शेतकऱ्याच्या शेतातून एक लाखांच्या गारगोटी जप्त केल्या आहेत. मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी ही कारवाई केली.
मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत यांना खबऱ्याकडून तालुक्यातील कर्णावला शिवारामध्ये पांढऱ्या रंगाच्या ओबडधोबड गारगोटी चा साठा केला आहे अशी माहिती मिळाली या माहितीची खात्री करून आज दि 14 संध्याकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस कर्मचारी श्री. आडे, श्री. ढवळे आणि श्री. इगल यांनी पंचांसमक्ष कर्णावला शिवारात रमेश गणपतराव चव्हाण यांच्या शेतातील घराच्या पाठीमागे छापा मारला. याच्यामध्ये एक लाख रुपये किमतीच्या चार टन गारगोटी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. शासनाच्या गौण खनिजाचा विनापरवाना साठा करणे, आणि चोरट्या पद्धतीने विक्री करणे, भारतीय दंड विधान कलम 379 नुसार रमेश चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान गणेश चव्हाण फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna