खुल्या दारू विक्रीला जमाअत- ए -इस्लामी हिंदच्या महिला विभागाचाही विरोध.
जालना- महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानामध्ये मद्य विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात जमाअत- ए- इस्लामी हिंदचा महिला विभागही रस्त्यावर उतरणार आहे.
आज मंगळवार दिनांक 15 रोजी या विभागाच्या महिलांनी पत्रकार परिषद घेऊन याविषयीची माहिती दिली. जमाअत- ए- इस्लामी हिंद जालना च्या वतीने दिनांक 15 ते 22 फेब्रुवारी दरम्यान “नशा मुक्ती अभियान” सुरू करण्यात आले आहे. या सप्ताहादरम्यान नशेच्या अधीन गेलेल्या व्यक्तींना या व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून आता शासनाने घेतलेल्या या निर्णयाच्या विरोधात हा महिला विभाग काम करणार आहे. सुरुवातीला निवेदने देऊन विरोध करून हा निर्णय रद्द करावा अशी मागणी केली जाणार आहे. तरीदेखील शासनाने निर्णय मागे घेतला नाही तर रस्त्यावर उतरण्याची तयारीही या महिला आघाडीने दाखवली आहे .एवढेच नव्हे तर किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये दारू विक्री करण्यासाठी कोणत्याही महिला आघाडी सोबत काम करण्याची तयारी ही या महिला आघाडीने दर्शविली आहे .आज पार पडलेल्या या पत्रकार परिषदेला जमाअत- ए- इस्लामी हिंद महिला विभागाच्या औरंगाबाद शहराध्यक्षा शाईस्ता कादरी, जालन्याच्या शहराध्यक्षा आमेना अलमास, शहराध्यक्षा अल्फिया आणि अम्मारा फिरदोस, मुमताज जोहरा यांची उपस्थिती होती.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna