“अन्नदाता सुखी भव” चार वर्षांपासून रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदानाचा उपक्रम
जालना- “अन्नदान सर्वश्रेष्ठ दान” . रिकाम्या पोटात दोन घास अन्न गेल्यानंतर त्याचा आत्मा तृप्त होतो आणि तोंडातून आपसूकच शब्द निघतात “अन्नदाता सुखी भव” मग तो अन्नदाता कोणीही असो. ही अन्नदानाची सेवा गेल्या चार वर्षांपासून अविरत सुरू आहे ती जिल्हा स्त्री रुग्णालयात .इथे आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना एक वेळ पोटभर अन्न मिळेल अशी व्यवस्था अन्नदात्यांनी केली आहे.
लायन्स क्लब ऑफ जालना गोल्डन ग्रुपच्या माध्यमातून शहरातील दानशूर व्यक्ती इथे अन्नदानासाठी मदत करतात. अन्नदात्यांनी आपले- आपले वार ठरवून घेतलेले आहे. त्यामुळे शिस्तबद्धपणे रोज सकाळी अकरा वाजता इथे अन्नदानाला आला सुरुवात होते .तत्पूर्वी एक सेवेकरी रुग्ण कक्षामध्ये जाऊन ज्या रुग्णाच्या नातेवाईकाला जेवणाची गरज आहे अशांना कुपन दिले जाते, आणि त्यानंतर या सर्वांना तळमजल्यावर बोलावून पोटभर अन्न दिले जाते. आपण रोज जे घरी जेवतो त्याला लाजवेल असं हे जेवण आहे. त्या मध्ये दोन पोळ्या ,एक वाटी भात, भाजी, फरसाण किंवा भजे, आणि एक गोड पदार्थ असं हे नित्याचेच भोजन. अन्नदाते जर भरपूर असतील तर सायंकाळी पाच वाजता देखील इथे अन्नदान केल्या जातं. या अन्नदानासाठी कोणीही मोबदला मागत नाही .इथे येणारे सेवेकरी देखील सेवाभाव म्हणूनच गेल्या चार वर्षांपासून अविरत सेवा देत आहेत. ही सेवा देण्यासाठी राजेश चोरटी हे प्रकल्प प्रमुखाची जबाबदारी पार पाडत आहेत, त्यांच्या मदतीला लक्ष्मण पोपट,लक्ष्मीकांत कंकाळ, रमेशभाई सर्वय्या, सागर गोडसे हे आहेत. ज्याला अन्नदान करायचं असेल त्यांनी कधीही सकाळी 11 वाजेच्या सुमारास रुग्णालयात यावं आणि या अन्नदानात सहभागी व्हावं असं आवाहन लक्ष्मीकांत कंकाळ यांनी केला आहे. स्त्री रुग्णालय म्हटल्यानंतर निश्चितच येथे महिलांची जास्त गर्दी असते . महिलांना बाहेर खाण्या-पिण्याची सवय नसते आणि ग्रामीण भागातील महिलांचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांना बाहेरची माहितीही नसते. त्यामुळे त्यांना उपाशी बसण्याची वेळ येऊ नये, म्हणून हा अन्नदानाचा उपक्रम सुरू आहे असेही श्री. कंकाळ यांनी सांगितले.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna