Jalna District

पोखरी सिंदखेड ते शेगाव पायी दिंडी सोहळ्याचे एक तप पूर्ण

वाघरुळ- जालना तालुक्यातील पोखरी सिंदखेड ते शेगाव या पायी दिंडी सोहळ्याला एक तप पूर्ण झाले आहे. बाराव्या वर्षी हा दिंडी सोहळा शेगाव कडे रवाना झाला आहे. पोखरी सिंदखेड परिसरातील दोनशे भाविक या दिंडी सोहळ्यात आहेत. गेल्यावर्षी कोरोना ची परिस्थिती असल्यामुळे हा दिंडी सोहळा रद्द करण्यात आला होता, मात्र यावर्षी पुन्हा तो सुरू करण्यात आला आहे.” गण गण गणात बोते” या जयघोषात दर कोस दर मुक्काम करत गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या अगोदर ही दिंडी शेगाव ला पोहोचते आणि प्रगट दिनाचा सोहळा डोळ्यांमधे साठवून घेऊन परतीच्या प्रवासाला लागते. गावात आल्यानंतर पुन्हा एकदा महाप्रसादाचा कार्यक्रम होतो आणि या दिंडी सोहळ्याचा समारोप होतो.

Related Articles